Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


गावकऱ्यांच्या हक्कासाठी दिपनगर ला शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन

दिपनगर प्रशासन १५ गावांच्या ग्रामस्थांना न्याय देत नसल्याने   दिनांक १३ फेब्रुवारी पासुन दिपनगर औष्णिक विद्युत प्रकल्प ग्रस्त १५ गावांमधील गावकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी व बेरोजगार तरुणांना नोकरीत सामावून घेणे साठी भुसावळ तालुका उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख दिपक सिंग राजपूत साहेब,, तालुका प्रमूख निलेश महाजन यांच्या उपस्थितीत दीपनगर येथील 660 M V प्रकलापाच्या मेन गेट समोर बेमुदत आंदोलन सुरू केले आहे .
   जोपर्यंत या नागरिकांना न्याय मिळणार नाही तोवर हे आंदोलनं सुरूच राहील व ठेकेदार, व राजकारण्यांची मुजोरी चालू देणारं नाहित अश्या अश्याचा इशारा तालुका प्रमूख निलेश महाजन यांनी दिलेला आहे
 या प्रसंगी भुसावळ शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी रहीम भाई गवळी,, शरद जोहरे,, शरद जयस्वाल, योगेश बागुल,, राजेश महाजन,, गणेश पाटील व आदी शिवसैनिक तसेच प्रकल्प ग्रस्त गावांमधील बेरोजगार तरुण मोठया संख्येनं उपास्थित आहेत

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.