Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


जोशी परिवाराचा राज्य स्तरीय सन्मान संपन्न

जोशी कुटुंबाच्या सेवाभावी कार्याचा राज्यस्तरीय सन्मान!
सतीश पाटील भडगाव तालुका प्रतिनिधी

*गुढे (ता. भडगाव) येथील रहिवासी आणि सध्या पुण्यात वैद्यकीय सेवेत कार्यरत असलेल्या सौ. नेहा मिलिंद जोशी आणि सौ. रोहिणी किरण जोशी यांनी गेल्या अनेक वर्षांपासून विविध सामाजिक, धार्मिक आणि आरोग्यसेवेच्या माध्यमातून उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या या निःस्वार्थ सेवाभावाची दखल घेत स्वराज्य क्रांती सेना पँथर आर्मी संघटनेच्या वतीने पुणे येथील श्रमिक पत्रकार संघ कार्यालयात त्यांना राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

*या दोघींनी १११ मोफत आरोग्य तपासणी शिबिरे, देहू-पंढरपूर पालखीतील वारकऱ्यांसाठी औषधवाटप, सांगली-कोल्हापूर येथील पूरग्रस्त महिलांना साड्या आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, आदिवासी पाड्यातील मुलांसाठी खाऊ डबे, पाणी बाटल्या आणि शैक्षणिक साहित्य वितरण, ठाणे-जेजुरी पालखी वारकऱ्यांना औषधवाटप, कोरोना काळात सॅनिटायझर, मास्क आणि मोफत औषधे वाटप, बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी औषध वाटप यांसारखी अनेक सामाजिक कार्ये सातत्याने केली आहेत.*


*हे कार्य जोशी कुटुंबाच्या सामाजिक आणि धार्मिक वारशाचे प्रतिक आहे. आदरणीय प्रमोद बापू आणि सौ. ताई यांनी आपल्या दोन्ही सुपुत्रांना तसेच सुना नेहा आणि रोहिणी जोशी यांना समाजसेवेचे संस्कार दिले, जे आजही डॉ. किरण जोशी आणि श्री. मिलिंद जोशी यांच्या सहकार्याने पुढे चालू आहेत.*


*फार्मसी शिक्षण घेतलेल्या सौ. नेहा आणि सौ. रोहिणी जोशी यांनी घर व कुटुंब सांभाळूनही अनेक आरोग्य शिबिरे, कपडे दान, अन्नदान तसेच गरजू विद्यार्थ्यांसाठी वह्या, पुस्तके आणि दप्तरे वाटप करून समाजसेवेत मोठे योगदान दिले आहे. याची दखल घेत स्वराज्य क्रांती पँथर सेनेने प्रथमच दिराणी-जेठाणीला स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित.केल्याने दिव्य महाराष्ट्र न्यूजचेउपसंपादक सतीश पाटील सह जय बाबाजी भक्त परिवाराकडून अभिनंदन  होत आहे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.