*पाचोरा नजिक झालेल्या रेल्वे अपघातातील जखमींची केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी घेतली भेट...*
*जळगांव* जिल्ह्यातील *पाचोरा* तालुक्यातील *परधाडे रेल्वे स्थानक* जवळ भीषण रेल्वे अपघातात जखमी झालेल्या काही प्रवाशांना *जळगांव* येथील *गोदावरी हॉस्पिटल* येथे दाखल करण्यात आले असून, आज *केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे* यांनी जखमी प्रवाशांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
तसेच संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांना योग्य सूचना देत सर्वांना उत्तम उपचार मिळावेत असे *केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे* निर्देश देऊन, जिल्हाधिकारी श्री.आयुष प्रसाद यांचे कडून रेल्वे अपघातातील जखमी प्रवासी व घटनेची माहिती घेतली.