Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


थोरगव्हाण येथील देशमुख विद्यालयात बालीका दिना निमित्त बालिकांचा सन्मान

देशमुख विद्यालयात राष्ट्रीय बालिका दिन निमित्त बालिकांचा केला सन्मान .
 


राष्ट्रीय बालिका दिन भारतात दरवर्षी २४ जानेवारी रोजी साजरा केला जातो. हा दिवस देशातील मुलींच्या हक्कांसाठी, त्यांना समानतेचा अधिकार मिळवून देण्यासाठी आणि त्यांच्या सक्षमीकरणासाठी जनजागृती करण्याच्या उद्देशाने साजरा केला जातो.
राष्ट्रीय बालिका दिनाचा इतिहास
राष्ट्रीय बालिका दिनाची सुरुवात भारत सरकारने २००८ साली केली. यामागील उद्दिष्ट समाजात मुलींबद्दल असलेली असमानता दूर करणे आणि त्यांच्या आरोग्य, शिक्षण, पोषण व सुरक्षिततेसाठी जागरूकता निर्माण करणे हे आहे.
महत्त्वाचे उद्देश: मुख्याध्यापक एस एस वैष्णव यांनी परिपाठातून मार्गदर्शन केले .
मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे.
बालविवाहासारख्या सामाजिक समस्यांना आळा घालणे.
मुलींच्या आरोग्याची आणि पोषणाची काळजी घेणे.लैंगिक समानतेबद्दल जनजागृती करणे.मुलींना त्यांच्या अधिकारांची जाणीव करून देणे.राष्ट्रीय बालिका दिनाचे महत्त्व:
राष्ट्रीय बालिका दिन केवळ एक सण नसून, मुलींना एक समान व सन्मानाचे स्थान मिळवून देण्याचा एक प्रयत्न आहे. हा दिवस समाजातील प्रत्येक व्यक्तीला मुलींच्या योगदानाची जाणीव करून देतो आणि मुलींसाठी सुरक्षित, सशक्त व समानतेचे वातावरण निर्माण करण्याचा संदेश देतो असे सांगितले .
प्रसंगी शिक्षिका जयश्री चौधरी शिक्षिका नयना पाटील , टी पी घुले , वाय जे कुरकुरे , जे ए चौधरी यांचे सह सर्व शिक्षक बंधु भगिनी शिक्षकेतर कर्मचारी बंधु विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.