भुसावळ:-श्री संत गाडगेबाबा हिंदी महाविद्यालयात प्राचार्य डॉ. रमेश जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक विभागातर्फे दिनांक 23 ते 25 जानेवारी पर्यन्त युवा उत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजनही करण्यात आले होते. त्यात रांगोळी स्पर्धा, मेहंदी स्पर्धा, हस्तकला व सलाद सज्जा तसेच दि 25 रोज साडी डे व पारंपरिक पोशाख
कार्यक्रम घेण्यात आले. साडी डे कार्यक्रमात मुलींनी पारंपारिक साडी परिधान करून साडी डे साजरा केला. तसेच मुलांनी देखील पारंपारिक वस्त्र परिधान करून सक्रिय सहभाग घेतला,महाविद्यालयातील युवक ,युवती यांनी मोठ्या उत्साहात हा वार्षिक उत्सव साजरा करून आपल्या कलागुणांचे प्रदर्शन केले. परीक्षक म्हणून भानुश्री
गोडीयाले, प्रा. राजश्री पाठक, प्रा.शिबा खान, प्रा. समता तायडे, यांनी काम पाहिले. युवा उत्सव कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सांस्कृतिक विभागाचे प्रा.अनुपम शर्मा, प्रा. ज्योती ओस्तवाल, डॉ. विवेक जोशी, डॉ. सुधीर शर्मा, प्रा.हितेश गुप्ता, प्रा.जाधव, प्रा.शिबा खान, प्रा.समता तायडे, यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन कार्यक्रम यशस्वी केले.