मराठी वृत्तपञ सृष्टीचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्ञी जांभेकर यांच्या जयंती निमित्त व ६ जानेवारी पञकार दिनानिमित्त भडगाव व्हाईस आॅफ मिडीया या आंतरराष्टीृय पञकार संघामार्फत पञकार दिनाचा कार्यक्रम भडगाव येथे हा कार्यक्रम पञकार संघाचे अध्यक्ष श्री. अशोकबापु परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.
हा कार्यक्रम सायंकाळी ६ वाजता येथील शासकीय विश्रामगृहात पार पडला. यावेळी सुरुवातीस उपस्थित मान्यवरांसह पञकार संघाच्या पदाधिकार्यांच्या हस्ते दर्पणकार आचार्य बाळशास्ञी जांभेकर यांच्या प्रतिमेचे पुजन करुन माल्यार्पण करण्यात आले.यावेळी पञकार संघाचे जिल्हा संपर्क प्रमुख श्री. विठ्ठलराव मराठे, पञकार संघाचे जेष्ट संचालक श्री. शिवदास महाजन, पञकार संघाचे भडगाव तालुकाध्यक्ष श्री. अशोक परदेशी यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी भडगाव तालुकाध्यक्ष श्री. अशोकबापु परदेशी, उपाध्यक्ष श्री. विलास पाटील, सचीव श्री. नरेॅद्र पाटील, संघटक श्री. आमिन पिंजारी, तालुका जेष्ट सल्लागार श्री. शिवदास महाजन, तालुका जेष्ट सल्लागार श्री. आत्माराम पाटील, भडगाव शहर उपाध्यक्ष श्री. गणेश पाटील, शहर कार्याध्यक्ष श्री. गणेश अहिरे, सेवानिवृत्त डीवाएसपी श्री. सुनिल सोनवणे, वृत्तपञ विक्रेते श्री. योगेश दिक्षीत, श्री. राजु दिक्षीत, श्री, प्रशांत खांडेकर, श्री. मंथन दीक्षीत, श्री. देविदास वाणी, श्री. जितेंद्र दिक्षीत यांचेसह नागरीक उपस्थित होते.