भुसावळ:- भुसावळ येथे आज रोजी गुरुवारी दि.०९/०१/२०२५ ला अखिल स्तरीय महा-ई सेवा केंद्र व आधार केंद्र संघटनेच्या वतीने विविध मागण्याचे निवेदन जिल्हा सचिव राकेश चव्हाण व तालुका अध्यक्ष वैशाली सरदार यांच्या नेतत्वाखालील देण्यात आले. या प्रसंगी तालुक्यातील तालुका पदाधिकारी अमोल राऊत (उपाध्यक्ष) , निलेश कोलते(सचिव), निलेश पाटील (सहसचिव), अनिश देशमुख(कोषाध्यक्ष), सल्लागार अँड. सागर बहीरूने, यांच्यासह
भुसावळ शहर व तालु्यातील महा- ई सेवा केंद्र व आधार केंद्र चालक मोठया संख्येने उपस्थित होते.
यावेळी भुसावळ विभागीय दंडाधिकारी जितेंद्र पाटील यांच्यासमोर निवेदन वाचून दाखविण्यात आले.या निवेदनावर सविस्तर चर्चा करण्यात आली व निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्री , महसूल मंत्री यांच्यासह सबंधित सर्व विभागाला देण्यांत आल्या. आपल्या मागण्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून सहकार्याची भावना जितेंद्र पाटील यांनी बोलून दाखविली.
त्यावेळी अमिन पटेल , समीर मन्सूरी, आकाश कोळी, वाजित खान, संतोष कोळी, चंदन तायडे, फरजना बेगम अब्दुल रहुफ, नीलकंठ गव्हाले, इमल्यास कासम, गुलाब पवार, रईस अहमद ताजमोहमद, प्रथमेश जोशी, राहुल सपकाळे, विकास चौधरी, अकीब बनीवाले, हरीश बोरसे, दिपक फेगडे, राहुल बरडे, शेख वसीम, इत्यादीसह इतर केंद्र चालक उपस्थित होते.