Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


भुसावळ फॅक्टरी कामगार युनियन महासचिव पदी दिनेश राजगिरे तर अध्यक्ष पदी आशिश मोरे यांची निवड

*कामगार युनिनची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न - आशिष मोरे अध्यक्ष, दिनेश राजगिरे यांची महासचिव म्हणुन निवड. करण्यात आली आहे .
     येथील ऑ. फॅ. कामगार युनियन ची वार्षिक सर्वसाधारण सभा दी. ०३/०१/२०२५ रोजी, कामगार भवन, युनियन कार्यालयावर ऐतिहासिक सभासदांच्या उपस्थितीत संपन्न झाली. संघटनेचा उपविधी नियमानुसार व अजेंडा विषयांवर चर्चा झाली. सर्व प्रथम गेल्या वर्षभरात मृत पावलेल्या सभासदांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. वार्षिक जमा खर्च पत्रक संतोष बाविस्कर यांनी मांडले त्यास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. संघटनेचे गेल्या वर्षाभरात युनियनचे कार्य बाबत विस्तारीत रिपोर्ट महासचिव दिनेश राजगिरे यांनी मांडला, कामगारांच्या हाताला काम ही भूमिका मांडत निर्माणीस आवश्यक वर्कलोड, कामगारांचे वेलफेअर चे प्रश्न अन्य युनियन संदर्भात प्रस्ताव पारित केले गेले, सभेत निविन पदाधिकारी यांची येणाऱ्या कार्य काळासाठी उपविधी नियम ९ व १० नुसार खालील प्रमाणे नेमणुक करण्यात आली.
*अध्यक्ष - आशिष मोरे 
*कार्याध्यक्ष -* निलेश देशमुख 
*उपाध्यक्ष -* मिलेश देवराळे, नितिन दत्तु पाटील, संजय लोखंडे, ज्ञानदेव सरोदे, हितेंद्र पाटील.
*महासचिव -* दिनेश राजगिरे 
*संयुक्त सचिव -* मोहन सपकाळे, हरीश बावस्कर. 
*संघटन साचिव -* शैलेंद्र पवार, शरद गुप्ता, आर बी वाणी, धनंजय पिंपळे, रवी सपकाळे, जितेंद्र मोरे, जावेद तडवी. *प्रचार सचिव -* गजानन इंगळे, गिरीश येवले, प्रवीण बोहित, विकास भटकर, हरिचरण बेलकर, प्रसाद भावसार, अनिल गरुड. *खजिनदार -* संतोष बाविस्कर, *सह खजिनदार -* रोशन चौधरी 
*ऑडिटर -* किशोर बढे, *ऑफिस सेक्रेटरी -* बिस्मिल्ला तडवी, संजय पाथरवट, *महिला आघाडी -* सौ. रेखा आव्हाड. 
 निवडणूकीचे कामकाज वरीष्ठ सेवानिवृत्त कर्मचारी मोहम्मद आरिफ व श्री गणेश पाटील प्रबंधक न्यु वर्कर्स क्रे को ओप.  सोसा. यांनी पाहिले. सभासदांकडून नवनिर्वाचित पदाधिकारी यांना शुभेच्छा देत असताना उत्साहपूर्ण वातावरण दिसून आले - स्नेह भोजनासह कार्यक्रमाची सांगता झाली आहे .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.