भाजप सरकारात मंत्री " अकार्यक्षम " आहेत का ? मग विकासाची कामे होतील कशी ?
समिती च्या बैठकीचा स्तर घसरतोय का ?
[ दिलीप सुरवाडे उपजिल्हा प्रसिध्दीप्रमुख व मा नगरसेवक शिवसेना भुसावळ यांनी मांडली प्रसार माध्यमा पुढे व्यथा ]
भुसावळ - जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती " दिशा " ची शनिवारी जळगाव येथे जिल्हा नियोजन भवनात बैठक झाली.
महामार्गावरच्या गैरसोयीमुळे सातत्याने अपघात होत आहेत. भाजपाचे आमदार यांनी तक्रार करून ही " एन एच ए आय " चे प्रकल्प संचालक शिवाजी पवार यांना धारेवर धरण्यात आले. व त्या संदर्भात " बाप " ही काढला !
या प्रकल्पाचे संचालक लोकप्रतिनिधींचे ऐकत नाही. भाजपाची जिल्ह्यात संपूर्ण सत्ता असूनही अधिकारी ऐकत नसतील तर जिल्ह्यातील प्रश्न कसे सुटतील ?
- नियोजन समितीचा स्तर घसरला ! -
जळगाव जिल्हा नियोजन समितीत विविध विकास कामांवर गेल्या अनेक वर्षांपासून चर्चा होत आहे. या बैठकीत संपूर्ण जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी सहभागी असतात.
ना. पालकमंत्री या बैठकीचे अध्यक्ष असतात. मंत्री अधिकाऱ्यांना योग्य त्या सुचना, आदेश देत असतात. मात्र या बैठकीत प्रथमच अधिकाऱ्यांचा " बाप " काढून नियोजन समितीच्या बैठकीला गालबोट लागून स्तर " घसरल्याचे दिसत आहे.
अधिकाऱ्यांना अशा शब्दांत सांगावे लागत आहे. हे होता कामा नये. यापुढे अशी वेळ येऊ नये असे वाटते.
तसेच सरकारात मंत्री असताना टोल नाके बंद करण्याची भाषा " विरोधी " वाटते ! मंत्री अधिकाऱ्यांपुढे हतबल झाल्यासारखे दिसत आहे. ही सरकार ची प्रतिमा योग्य नाही. अशी होऊ नये.
- विरोधकांच्या तक्रारींचीही दखल घेतली जात नाही !
जळगाव जिल्ह्यात महामार्गावर च्या तक्रारी आहेतच. भुसावळ च्या नाहाटा कॉलेज पुलाखाली पाणी साचते.अधिकारी अजूनही दखल घेत नाही. भुसावळ मध्ये वाहतूक समस्या, रोडचा दर्जा, पिण्याचे पाणी,दीपनगर चे प्रदुषण अशा अनेक बाबतीत समस्या आहेत. शिवसेना ( ठाकरे) पक्षाने गेल्या २/३ वर्षात मोर्चा, निवेदन देऊन मागणी केली. परंतु विरोधी पक्षाचे अधिकारी ऐकत नाही. त्यामुळे अशा " अकार्यक्षम " अधिकाऱ्यांवर मंत्री वर्ग कोणती कारवाई करणार आहे ? का हे फक्त " दिखावा " आहे ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
या समितीच्या बैठका शिस्तबद्ध व सभ्यतेला धरून झाल्या पाहिजेत. अधिकाऱ्यांना अपमानित न करता विकास चर्चा झाल्या पाहिजेत असे आम्हाला वाटते.