सतीश पाटील भडगाव तालुका प्रतिनिधी
पाचोरा शहरातील अतिक्रमित घरे मोजणी प्रक्रियेला आज दिनांक 31/1/2025 शुक्रवारी रोजी माननीय कार्यसम्राट आमदार किशोर आप्पा पाटील साहेब यांचे हस्ते शुभारंभ सुरुवात आज करण्यात आली*
आज पासून सुरू होणार्या जागा नावे लावण्याच्या मोजणी मोहिमेतून पाचोरा शहरातील सुमारे 3500 अतिक्रमित मालमत्ता धारकांना मिळणार लाभ
कार्यसम्राट आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या सूचनेनुसार नगर परिषद प्रशासनाने पाचोरा शहरातील शासकीय जागेवरील सुमारे 3500 अतिक्रमित घरे नियमानुकूल करून नावावर लावण्या बाबतची कार्यवाही सुरू केली असून आज शुक्रवार सकाळी 10 वाजता शहरातील जनता वसाहत भागातील धम्मोदय बौद्ध विहार भागातून मोजणी प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे.
पाचोरा शहराचे काही टप्पे केले असून पहिल्या टप्यात शहरातील जनता वसाहत भागातील सुमारे 250 घरांच्या मोजणी होणार आहे. यामुळे वर्षानुवर्षे अतिक्रमित घरे नावावर होण्याची आस लाऊन बसलेल्या सर्वसामान्य नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला आहे.
शासनाचे 2011 पूर्वीची सरकारी जमिनीवरील रहिवासी क्षेत्रातील घरांचे अतिक्रमण नियमनाकुल करण्याचे धोरण आहे. मात्र याबाबत कार्यवाही होत नसल्याने अतिक्रमण धारकांनी कार्यसम्राट आमदार किशोर आप्पा पाटील यांची भेट घेत विषय मार्गी लावण्याची विनंती केली होती. त्या अनुषंगाने आमदार किशोर आप्पा पाटील यांनी पाचोरा व भडगाव शहर हद्दीतील सर्वच शासकीय जागेवरील अतिक्रमित धारकांची घरे नावावर लावण्याबाबत शासकीय आदेशाप्रमाणे तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेशित केल्याने पाचोरा नगरपरिषद प्रशासनाने आवश्यक मोजणी फी भरून मोजणी प्रक्रियेला सुरुवात केली आहे. दरम्यान पाचोरा व भडगाव शहरातील नगरपालिका हद्दीतील सुमारे सात हजार अतिक्रमण घरे असून टप्प्याटप्प्याने ही घरे नावावर लावण्यात येणार आहेत. तरी अतिक्रमित मालमत्ता धारक बांधवानी या मोजणी प्रक्रियेत सर्व कर्मचारी वर्गाला सहकार्य करून मोजणी प्रक्रिया सुलभपणे पार पाडून घेण्याचे आवाहन मुख्याधिकारी मंगेश देवरे यांनी केले आहे.
बोले तैसा चाले
विधानसभा निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनाच्या पूर्ततेच्या दिशेने आपण पाऊल टाकले असून पाचोरा व भडगाव शहर नगरपालिका हद्दीतील अतिक्रमित घरे नावावर लावण्याची प्रक्रिया नगरपरिषदेने सुरू केली असून टप्प्याटप्प्याने पाचोरा व भडगाव शहरातील सरकारी जागेवरील सुमारे सात हजार मालमत्ता धारकांना त्याचा लाभ होणार आहे. यामुळे गोरगरीब जनतेला आपण लाभ मिळून देणार असल्याचे आपल्याला मनस्वी समाधान आहे असे प्रतिपादन कार्यसम्राट आमदार किशोर आप्पा पाटील यांनी केले.
त्या प्रसंगी माजी नगराध्यक्ष संजय गोहिल, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश पाटील, शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर बारवकर , प्रविण ब्राह्मणे,शिवसेना रवी पाटील, शिवसेना भावडू दादा, शिवसेना शाकिर बागवान, शिवसेना आबा कुमावत, तसेच मुख्याधिकारी मंगेश चव्हाण, भूमी अभिलेख कार्यालयाचे उपअधीक्षक एम व्ही तोटावार, शहर अभियंता भैय्यासाहेब पाटील,पालिकेचे उपमुख्याधिकारी डी एस मराठे,दुर्गेश सोनवणे,विलास देवकर,नगररचना विभागाचे धीरज नेटके तसेच नागसेन नगर येथील दीपक ब्राम्हणे सर, विजय गायकवाड, विनोद शेजवळ, दीपक शेजवळ, भिवसने सर, स्मिता ताई भीवसने,माया ताई केदार, सोनावणे ताई, गायत्री ताई सतदिवे , तसेच मोठ्या प्रमाणात परिसरातील नागरिक उपस्थित होते