आंबेडकरी व्हाईस मिडीया फोरमच्या वतीने शेगाव येथे पार पडलेल्या पहिला "मूकनायक पत्रकार दिन" मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला त्यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी उत्तम वानखेडे तर स्वागाध्यक्षपदी संघटनेचे केंद्रिय महासचिव प्रकाश सरदार हे होते. सर्व प्रथम कार्यक्रमाच्या सुरुवातीला महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून त्रिशरण पंचशील घेण्यात आले त्यानंतर सन्मान सोहळ्यात थायलंड येथून उपस्थित झालेले गगन मलिक ज्यांनी मालिका रामायणामध्ये रामाची तर गौतम बुद्ध या मालिकेत गौतम बुद्धांची उत्कृष्टरित्या भूमिका निभवणारे गगन मलिक यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्द्घटन करण्यात आले
उद्घाटन प्रबुद्ध भारताचे संपादक जीतरत्न पटाईत याच्या हस्ते करण्यात आले.
संघटनेच्या वतीने गगन मलीक यांना"धम्मरत्न" पुरस्कार संघटनेचे अध्यक्ष उत्तम वानखेडे यांच्या हस्ते देण्यात आला.गगन मलीक यांनी जगात भारतातील बुद्ध धम्मचा प्रचार प्रसार करणारे गगन मलिक यांच्या कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात आला.
पत्रकारांचे तसेच विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचे संघटनेच्या वतीने केंद्रीय व राज्य पदाधिकारी यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले सोबत सविधन अमृत महोत्सव निमित्त सर्व मान्यवरांना संविधान प्रति देण्यात आल्या.
हा दिमाखदार व भव्यदिव्य सोहळा शेगाव शहरातील हाॅटेल शिवांश सेलीब्रेशन येथे दि. ३१ जानेवारी २०२५ शुक्रवार रोजी पार पडला
आंबेडकरी व्हाईस मिडीया फोरम ही पत्रकाराच्या न्याय व हक्कासाठी संविधानीक रीत्या स्थापन झालेली असुन संघटनेच्या वतीने पहीलाच राज्यस्तरीय "मूकनायक" पत्रकार दिन सोहळा आयोजीत केला होता.
सदर कार्यक्रमा महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक राहुल अन्विकर यांना कला गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.यावेळी जेष्ठ स्तभलेखक दादाभाऊ अभंग यांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी चळवळीचे पहीले वर्तमान पत्र मुकनायक का सुरु केले,व वर्तमानपत्राची चळवळीला कीती व कशी आवश्यकता आहे याबाबत व भिमा कोरेगावच्या ईतीहासाबाबत व न्यायालयीन लढ्याबाबत सखोल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात विवीध क्षेत्रात नामांकीत अठ्ठावीस गुणीजनांना विवीध पुरस्काराने सन्मानीत करण्यात येऊन संघटनेच्या
.विचारमंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष उत्तम वानखडे, गगन मलिक, दादाभाऊ अभंग, देवा भाऊ हिवराळे प्रबुद्ध भारतचे जितरत्न पटाईत, प्रकाश सरदार , यांची प्रमुख मार्गदर्शनपर भाषणे झाली.प्रमुख उपस्थीतीत पंडीत परघरमोर,महेद्र सावंग,पोपट कांबळे,देवचंद्र सम्दुर,पद्मा मोहोळ,मोनीका गणवीर, सिद्धार्थ पैठने,आदींची उपस्थीती होती.
जळगाव जिल्ह्यातून ॲड.राजेश झालटे यांना "खानदेश रत्न" तर भुसावळचे सामजिक कार्यकर्ते विनोद सोनावणे यांना सामजिक कार्य पुरस्कारने सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शिलांबरी जमदाडे यांनी तर आभार प्रदर्शन शितल शेगोकार यांनी केले. ह्या सोहळ्याला संघटनेचे संपुर्ण राज्यभरातुन प्रतिनीधी व आंबेडकरी पत्रकारांची उपस्थिती उल्लेखनीय होती.
सदर कार्यक्रमात महेंद्र सावंग यांच्या एम.एस.मुझिक संच व राहूल अंविकर यांनी त्याच्या गितामुळे सर्व पत्रकार मध्ये नवा जोश निर्माण झाला.
या कार्यक्रमास जळगांव जिल्ह्यातून मोठ्या संख्येने पत्रकार उपस्थित होते त्यामध्ये उत्तरं महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश तायडे, राजेश तायडे, जिल्हा अध्यक्ष दिनेश ईखारे, सुमित सोनावणे, सुनिल आराक , राहूल गाढे, बाळु शिरतूरे, संतोष कासोदे नगिंदास इंगळे, प्राजक्ता तायडे,क्रांतीलाल गाढे ,प्रविण धुंदले,प्रशांत गाढे ,मेजर मकासरे हे उपस्थित होते.
तर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष, महेंद्र सावंग, राज्य महासचिव देवचंद समदूर व राज्य व जिल्हा कार्यकारणीचे महत्त्वाचे योगदान लाभले.