Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


जि.प कर्मचारी रनिंग स्पर्धेत समाधान जाधव सर प्रथम

जिल्हा परिषद अधिकारी, कर्मचारी 100 मीटर धावणे क्रीडा स्पर्धेत उपशिक्षक समाधान जाधव जळगाव  जिल्ह्यातून प्रथम



 जळगाव जिल्हा अधिकारी आणि कर्मचारी यांच्या क्रीडा स्पर्धा  आणि सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धा दिनांक 11 जानेवारी आणि 12 जानेवारी 2025 रोजी  छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल जळगाव या ठिकाणी पार पडल्या.

 या क्रीडा स्पर्धेमध्ये भुसावळ तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंदी या शाळेतील उपशिक्षक समाधान जाधव यांचा 100 मीटर धावणे जिल्ह्यातून प्रथम क्रमांक आला. आणि 400 मीटर धावणे या स्पर्धेत जिल्ह्यातून द्वितीय क्रमांक आला. 

मुख्य कार्यकारी अधिकारी जळगाव अंकित कुमार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सोमवंशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा कुडचे, माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण, प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील, यांच्या हस्ते त्यांना ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.

 या पारितोषिक समारंभ वितरण प्रसंगी जळगाव जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुख, अधिकारी सर्व तालुक्यांचे गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख, क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमात सर्व तालुक्यांमधील सहभागी शिक्षक, शिक्षिका कर्मचारी उपस्थित होते. त्याबद्दल उपशिक्षक समाधान जाधव यांचे भुसावळ तालुक्याचे गटविकास अधिकारी डॉ.सचिन पानझडे, गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोळे, सहाय्यक गटविकास अधिकारी डी जी जाधव, कनिष्ठ प्रशासन अधिकारी अधिकारी सचिन पाठक, भांडारपाल सुनिल उबाळे आणि सर्व अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, शिक्षिका यांनी अभिनंदन आणि कौतुक केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.