थोरगव्हाण देशमुख विद्यालयात 12 जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ , स्वामी विवेकानंद जयंती साजरी करण्यात आली आहे .
१२ जानेवारी, हा दिवस दोन महान विभूतींच्या जयंती निमित्ताने साजरा केला . राजमाता जिजाऊ आऊसाहेब आणि युगपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या योगदानाला दी एज्यूकेशन सोसायटी थोरगव्हाण स्थापना 1917 व डी एस देशमुख माध्य. उच्च माध्यमिक विद्यालय थोरगव्हाण यांचे कडून उपाध्यक्ष ऊमाकांत बाऊस्कर प्रतिमा पुजन पुष्पमाळा वाहून त्यांचे कार्याचे स्मरण केले .
राजमाता जिजाऊ (आऊसाहेब) जिजाबाई, ज्यांना प्रेमाने जिजाऊ असे संबोधले जाते, त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री आहेत. त्यांच्या चरित्रात एक स्फूर्तिदायक प्रेरणा सामावलेली आहे. जिजाबाईंनी शिवाजी महाराजांमध्ये स्वराज्याची भावना जागृत केली व त्यांच्या शौर्यपूर्ण जीवनाचा पाया रचला. त्यांच्या संस्कारांमुळेच शिवाजी महाराजांनी भारताच्या इतिहासात एक सुवर्ण पान लिहिले. 'अशी असावी माता जिचा वाटावा अभिमान, पुत्र घडविला असा, जो राष्ट्राची शान.' हे शब्द जिजाऊंच्या कर्तृत्वाचे दर्शन घडवतात.
याच दिवशी स्वामी विवेकानंद यांची जयंतीही साजरी केली जाते. त्यांनी भारतीय संस्कृती आणि अध्यात्माचे जागतिक स्तरावर दर्शन घडवले. 'उठा, जागे व्हा, जोपर्यंत ध्येयापर्यंत पोहोचत नाही, तोपर्यंत थांबू नका' हा त्यांचा संदेश आजही तरुणाईला प्रेरणा देतो. विवेकानंदांच्या शिकवणींनी भारतीय जनतेला आत्मनिर्भरतेचा आणि स्वाभिमानाचा मार्ग दाखवला.
स्मरणोत्सव आणि सन्मान निमित्त सावित्रीबाई फुले जयंती ते राजमाता जिजाऊ जयंती सप्ताह निमित्त थोरगव्हाण तसेच पंचक्रोशितील 15 आदर्श कर्तुत्ववान महिला यांचा सन्मान संपन्न झालाआणि स्वामी विवेकानंद यांचा संस्था शाळे तर्फे त्यांच्या विचारांचे स्मरण करून त्यांचा आदर व्यक्त केला .प्रतिमा पुजन प्रसंगी दिनविशेष महत्व सांगतांना मुख्याध्यापक सत्यनारायण वेष्णव यांनी म्हटले की राजमाता जिजाऊ तसेच राष्ट्रपुरूष यांच्या कार्य शिकवणुकींचा आदर्श घेतला जावा. जिजाऊंच्या शौर्य धैर्यपूर्ण संस्कारांचा आणि विवेकानंदांच्या विचारांचा आदर्श ठेवून, तरुण पिढीला प्रगतीचा मार्ग आजच्या युवती युवकांना सुकर करता येईल.जयंतिनिमित्त त्रिवार मानाचा मुजरा! करण्यात आला .
या प्रसंगी मान्यवरांसह जेष्ठ लिपिक रविंद्र चौधरी पालक भगवान पाटील शिक्षकेतर कर्मचारी बंधु संजय ( योगेशा ) झोपे, अक्षय तायडे उपस्थित होते .