Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


यावल येथील जेष्ठ समाजसेवक माधवराव देशमुख यांचे निधन

निधनवार्ता

यावल येथील स्व. माधवराव त्र्यंबकराव देशमुख 
यांचे दुःखद निधन  १ जानेवारी रोजी झाले असून अंत्ययात्रा सायंकाळी 07.00 वाजता  देशमुख वाडा येथून निघणार आहे .
यावल येथील देशमुख वाड्यातील मूळ रहिवासी, आदर्श नामवंत शेतकरी तसेच दि एज्युकेशन सोसायटी थोरगव्हाण (स्थापना 1917)  पितामह ज्येष्ठ शालेय समिती संचालक व मार्गदर्शक, तारकेश्वर विद्या प्रसारक मंडळ यावल सेक्रेटरी , माजी नगराध्यक्ष यावल , लेवा पाटील थोरगव्हाणकर समाज प्रवाहाचे दिग्गज व्यक्तीमत्व  स्व. माधवराव त्र्यंबकराव देशमुख यावल (वय 97 ) यांचे दि. 01 जानेवारी, बुधवार रोजी सकाळी 06 45 वाजता वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.
ते प्रगतीशील शेतकरी  यावल व दि एज्युकेशन सोसायटी थोरगव्हाणचे सहसचिव रामराव देशमुख यांचे वडील होत.
त्यांचे पश्चात रामराव देशमुख , शिरीष देशमुख , दोन सूना, पाच मुली ,जावाई ,नातवंडे असा मोठा परिवार आहे.
दि एज्युकेशन सोसायटी थोरगव्हाणचे अध्यक्ष चंद्रकांत चौधरी, उपाध्यक्ष उमाकांत बाऊस्कर, सचिव पवन चौधरी, सर्व संचालक, बंधू-भगिनी, मुख्याध्यापक सत्यनारायण वैष्णव, पर्यवेक्षक डी. के. पाटील व सर्व स्टाफ यांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.