आज जय गणेश जेष्ठ नागरिक संघ भुसावळची कार्यकारिणी सभा जय गणेश फाउंडेशन चे अध्यक्ष श्री. राजेंद्र यावलकर यांच्या अध्यक्षते खाली सम्पन्न झाली. या सभेत मागील वर्षभराचा कार्याचा आढ़ावा घेण्यात आला. त्यानंतर वर्ष 2025-26 या वर्षासाठी नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. त्यात संघाच्या अध्यक्षपदी प्रा. डॉ. सौ. सुधा मधुकर खराटे यांची एकमताने निवड करण्यात आली तसेच सचिवपदी श्री. दिलीप मधुकर तिड़के यांची निवड करण्यात आली. या दोघाची निवड झाल्याबद्दल जय गणेश फाउंडेशनचे अध्यक्ष श्री. राजेंद्र यावलकर यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला आणि इतर कार्यकारिणी सदस्य यांचे अभिनन्दन केले. या प्रसंगी जय गणेश फाउंडेशनचे संस्थापक आदरणीय श्री उमेश भाऊ नेमाड़े विशेष अतिथि म्हणून उपस्थित होते. त्यांनी आपल्या भाषणात नवीन कार्यकारिणीचे अभिनन्दन करुन शुभेच्छा दिल्या. यावेळी मावळते अध्यक्ष श्री राजेंद्र बावस्कर आणि नूतन अध्यक्ष सौ सुधा खराटे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आभार प्रदर्शन श्री. ज्ञानदेव इंगळे यांनी केले. नवीन कार्यकारिणीत 21 सदस्याची निवड करण्यात आली.