Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


पर्यावरण प्रेमी सुरेद्रसिंग पाटील यांना पी एच डी बहाल

पर्यावरण प्रेमी सुरेंद्रसिंग पाटील यांना विद्यावाचस्पती पी. एच. डी. पदवी बहाल.                         पंडित दीनदयाल उपाध्याय हिंदी विद्यापीठाने सन्मानित केले.       पंडित दीनदयाल उपाध्याय हिंदी विद्यापीठ वृंदावन धाम मथुरा द्वारा विद्यावाचस्पती सारस्वत सन्मान समारंभ रविवार दिनांक 22 डिसेंबर 2024 ला हॉटेल सायाजी विजयनगर इंदोर मध्य प्रदेश येथे आयोजित करण्यात आला.                          भुसावल जिल्हा जळगाव महाराष्ट्र येथील पर्यावरण प्रेमी श्री सुरेंद्रसिंग  गोविंदसिंग पाटील  संचालक पर्यावरण जागर प्रतिष्ठान महाराष्ट्र यांना  विद्या वाचस्पती सारस्वत सन्मान पी. एच. डी. डिग्री व मेडल मान्यवर राष्ट्रीय पर्यावरणविद एवं वर्ल्ड रेकॉर्ड धारी माननीय डॉ विश्वनाथ पाणीग्रहीजी, प्रदेश प्रभारी मुख्यमंत्री उदय योजना शिक्षा विभाग मध्य प्रदेश माननीय विश्वनाथ कनकनेजी, सेवानिवृत्त न्यायाधीश भोपाल माननीय श्री देवेंद्रकुमार जैनजी, सुप्रसिद्ध कथा वाचिका वृंदावन धाम मथुरा सुश्री दीपा मिश्राजी,  महाराष्ट्र राज्य संयोजक पंडित दीनदयाल उपाध्याय हिंदी विद्यापीठ माननीय डॉ शिवाजी  शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.                                         सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ऋग्वेद मधील मंत्र म्हणत दीप प्रज्वलन करण्यात आले तसेच सर्व उपस्थित मान्यवर सत्करार्थी सर्व उपस्थितांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली. सर्व उपस्थित मान्यवरांनी हिंदी भाषेवर जोर देत हिंदी भाषेचा प्रचार व प्रसार होणे जरुरी आहे हिंदी ही आपली राष्ट्रभाषा आहे देशातील अनेक भागांमध्ये हिंदी ही बोलीभाषा असून तिचा विकास होणे जरुरी आहे प्रत्येकाला हिंदी भाषेचा अभिमान असला पाहिजे हिंदी भाषेला विशेष दर्जा प्राप्त झाला पाहिजे प्रत्येक हिंदुस्तानीला हिंदी भाषेचा गर्व असला पाहिजे.          
  कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचालन आभार प्रदर्शन माननीय जानकी वल्लभ शास्त्रीजी यांनी केले.           
कार्यक्रम यशस्वीतेसाठी पंडित दीनदयाल उपाध्याय हिंदी विद्यापीठाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.