Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


थोरगव्हाण येथील देशमुख विद्यालयात विधी जन जागृती कार्यशाळा संपन्न

थोरगव्हाण येथे देशमुख विद्यालयात विधी जनजागृती कार्यशाळा
विधी सेवा समिती व देवगिरी कल्याण आश्रमचा पुढाकार
विद्यार्थ्यांच्या वर्तनात सकारात्मक बदल घडवणे, लोकशाही मूल्यांची रुजवणूक करणे आणि कायद्याबाबतची जनजागृती करण्यासाठी थोरगव्हाण येथील डी. एस. देशमुख हायस्कूल व विधी सेवा समिती, भुसावळ तसेच देवगिरी कल्याण आश्रम यांच्या संयुक्त विद्यमाने विधी जनजागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
कार्यशाळेचा मुख्य उद्देश विद्यार्थी व नागरिकांना त्यांच्या कायदेशीर हक्कांची माहिती देणे आणि गरजू व्यक्तींना न्याय मिळवण्यासाठी सहाय्य करणे हा होता.
कार्यशाळेची वैशिष्ट्ये व चर्चेतील मुद्दे:
 विधी सेवा समितीची भूमिका:गरीब व वंचितांसाठी मोफत कायदेशीर सल्ला प्रदान करणे.
न्यायालयीन प्रकरणांसाठी विनामूल्य सहाय्य.
तंटामुक्त गाव अभियानांतर्गत तंटे सोडवणे.
कायदेशीर हक्कांची माहिती:
मूलभूत अधिकार, महिला व बालहक्क याविषयी सखोल चर्चा.
सायबर गुन्हे व त्यावरील उपाययोजना.
मोफत विधी सेवा योजनेचा लाभ कसा घ्यायचा याविषयी मार्गदर्शन.
विद्यार्थ्यांसाठी संदेश:
अँड. प्रफुल्ल पाटील यांनी "पोस्को कायदा" (Pocso Act) तसेच चांगला स्पर्श व वाईट स्पर्श यातील फरक समजावून सांगितला.
विद्यार्थ्यांनी कोणत्याही अप्रिय घटनेची माहिती पालक किंवा शिक्षकांना द्यावी, व्यक्त होणे शिकावे, हा संदेश दिला.
 दिव्यांगांसाठी कायदा:
अँड. जास्वंदी भंडारी यांनी दिव्यांग व्यक्तींना दिलेल्या कायदेशीर हक्कांविषयी मार्गदर्शन केले .  अँड. जयश्री देशमुख यांनी "झाशीची राणी" या ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वाविषयी प्रेरणादायक माहिती दिली.
अँड. कैझर भारमल यांनी विधी सेवा समितीची कार्यपद्धती व सेवा वरील प्रमाणे समजावून सांगितली.
मान्यवरांचा सत्कार व आयोजन:
कार्यक्रमाचे अध्यक्ष व संस्थेचे उपाध्यक्ष उमाकांत बाऊस्कर यांनी मान्यवरांचा सत्कार शाल, गुलाबपुष्प देऊन केला व अशा कार्यक्रमांचे आयोजन भविष्यातही करण्याची अपेक्षा व्यक्त केली.
महिला तक्रार निवारण समितीच्या भगिनी सदस्य सौ. जयश्री प्रविण चौधरी व सौ. नयना ज्ञानेश्वर चौधरी यांनी महिला वक्त्यांचा सन्मान केला.
प्रास्ताविक व सूत्रसंचालन युवराज कुरकुरे यांनी केले.
दर्शनी फलक लेखन कला शिक्षक एस. बी. सपकाळे यांनी केले.
मुख्याध्यापक सत्यनारायण वैष्णव यांनी प्रासंगिक उदाहरणे देऊन मनोगत व्यक्त केले.
मान्यवरांचा परिचय पर्यवेक्षक डी. के. पाटील यांनी करून दिला. संस्थेचे सन्माननीय पदाधिकारी चेअरमन चंद्रकांत चौधरी सचिव पवन चौधरी सहसचिव रामराव देशमुख सर्व सन्माननीय संचालक बंधु भगिनी यांनी या कार्यक्रमाचे अभिनंदन कौतुक केले आहे .
या कार्यक्रमाला शिक्षक, विद्यार्थ्यांसह मोठ्या संख्येने  हजेरी लावली

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.