लेवा पाटील थोरगव्हाणकर वधुवर परीचय मेळावा – नवतरुणांसाठी सुवर्णसंधी: 10 वा वधुवर परीचय मेळावा नाविन्य पूर्ण पद्धतीने संपन्न करू:
अध्यक्ष . उमाकांत बाऊस्कर .
थोरगव्हाण तालुका रावेर येथे थोर सन्मित्र फाऊंडेशन तर्फे 10 वा वधुवर परीचय मेळावा व समाजातील उत्कृष्ठ अलौकीय कार्य करणाऱ्या तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न होणार आहे .
विवाह हा प्रत्येकाच्या जीवनातील महत्त्वाचा टप्पा असतो. आपल्या नव्या पिढीला जीवनसाथी निवडण्यासाठी योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी थोर सन्मित्र युवा फाऊंडेशन थोरगव्हाणकर फाऊंडेशन दरवर्षी वधुवर मेळावा आयोजित करते. या उपक्रमामागील उद्दिष्ट म्हणजे विवाह इच्छुक वधू-वरांना तसेच त्यांच्या पालकांना एकमेकांशी थेट संवाद साधण्यासाठी योग्य संधी उपलब्ध करून देणे हा आहे.
फाऊंडेशनचे महत्त्व:
थोर फाऊंडेशनने वधू-वर मेळाव्यांद्वारे अनेक कुटुंबांना नव्या नात्यांच्या रेशीम गाठी बांधण्याची संधी दिली आहे. थोर संन्मित्र युवा फाऊंडेशन सामाजिक बांधिलकीतून कार्यरत असून विवाह प्रक्रिया पारदर्शक, सुलभ आणि विश्वासार्ह बनवण्यासाठी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा उपयोग करते. वर्षे 2024 - 2025 या वर्षाची सर्वात पहिली वधुवर परीचय सुची प्रथम आम्हीच प्रकाशित करू असे प्रतिपादन सचिव योगेश झोपे यांनी सांगितले.
मेळाव्याचे वैशिष्ट्य:
संवाद आणि परिचयाचा मंच
वधू-वरांना आणि त्यांच्या कुटुंबियांना थेट संवाद साधता येतो.
प्रत्येकाला समान संधी देण्यावर भर.
सुव्यवस्थित नावनोंदणी प्रक्रिया:
डिजिटल नावनोंदणीसाठी थोरगव्हाण कर शुभमंगल मोबाइल ॲप उपलब्ध आहे.
थोरगव्हाण फाऊंडेशन साइन अप लिंक http://
thorgavanfoundation.com/ वर sing up करून नावनोंदणी करू शकता. अशी नम्र विनंती .
समाजाला जोडणारा दुवा:
आपल्या परिचयातील विवाह इच्छुक तरुण-तरुणी आणि त्यांच्या पालकांपर्यंत ही माहिती पोहोचवण्यासाठी प्रोत्साहन द्यावे.
आजचा विवाह संकल्प समाज बांधणीसाठी केवळ दोन व्यक्तींच्या नात्यापेक्षा जास्त महत्त्वाचा आहे. समाजात जबाबदार कुटुंब निर्माण होण्यासाठी विश्वासार्हता, सुसंवाद आणि परस्पर आदर यांचा पाया घालणे गरजेचे आहे. थोर सन्मित्र युवा फाऊंडेशन थोरगव्हाण या समाज कार्यासाठी उद्दिष्टांशी बांधिल आहे. असे मत फाऊंडेशनचे खजिनदार विलास चौधरी यांनी व्यक्त केले .
कार्यक्रमाची महत्त्वाची माहिती:
मेळाव्याची तारीख:11 फेब्रुवारी 2025 .
ठीकाण : - डी .एस देशमुख विद्यालय थोरगव्हाण क्रीडांगण येथे संपन्न होणार आहे .
नोंदणीची अंतिम तारीख:
31 डिसेंबर 2024 .
नावनोंदणी शंका निरसन करण्यासाठी
संपर्क क्रमांक : -
9421038063
, 9096963372 .
टिप:विलंब न करता आजच नावनोंदणी करा आणि या सुवर्णसंधीचा लाभ घ्या!
विवाह इच्छुक नवतरुणांना, त्यांच्या पालकांना आणि शुभचिंतकांना मेळाव्यासाठी मनःपूर्वक आमंत्रण!
थोर सन्मित्र युवा फाऊंडेशन थोरगव्हाण ता . रावेर . सर्व पदाधिकारी सर्व संचालक मंडळ व समस्त गावकरी मंडळी थोरगव्हाण .