Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


भुसावळ येथील ७४ वर्षीय वडीलांनी मुलीला किडनी देवुन वाचविले प्राण

वडिलांचे प्रेम आणि त्याग काय असतो याचा भुसावळ येथे चांगला प्रत्यय आला आहे   वयाच्या ७४ व्या वर्षी किडनी दान करून आपल्या मुलीचे प्राण वाचवले आहे 
 वडिलांचे प्रेम आपल्या मुलांसाठी कोणताही त्याग करण्यास तयार असते.  ही कथा एका बापाची आहे ज्याने आपल्या मुलीचे प्राण वाचवण्यासाठी आपली किडनी दान केली.

भुसावळ येथील राहणारे श्री आत्माराम तोताराम धाडे यांनी वयाच्या ७४ व्या वर्षी  हे आपल्या मुलीसाठी जीवनदायी ठरले.  त्यांच्या मुलीला सौ. अलका विजय तायडे किडनीचा गंभीर आजार होता आणि तिला किडनी प्रत्यारोपणाची तातडीची गरज होती.

 वडिलांनी न डगमगता किडनी दान करण्याचा निर्णय घेतला.  त्यांच्या या उदात्त कृतीमुळे त्यांच्या मुलीचा जीव तर वाचलाच पण एक बाप आपल्या मुलासाठी काहीही करू शकतो हेही समाजाला आजच्या यांत्रिक युगात दाखवून दिले.

 अवयवदान किती महत्त्वाचे आहे आणि ते जीवन कसे वाचवू शकते  याची आठवणही ही सत्यकथा करून देते.  ह्या घटनेतून अनेकांनी अवयवदानाचा संकल्प  केला आहे आणि  अनेकाना प्रेरणा देत आहे आणि त्यांना अवयव दानाच्या महत्त्वाची जाणीव करून देत आहे.

 प्रेम आणि त्याग याला वय नसतं हेही या वडिलांच्या त्यागाची कथा शिकवते.  ही घटना कुटुंबाप्रती असलेल्या प्रेमाची आणि समर्पणाची आठवण करून देते."
श्री आत्माराम तोताराम धाडे यांची पार्श्वभूमी
 - श्री आत्माराम तोताराम धाडे यांचा जन्म नरवेल ता. मलकापूर येथे झाला.
 त्यांनी अतिशय गरिबीत आपले बालपण व्यतित केले आहे शेतकऱ्याच्या शेतांत सालदारी ते ट्रॅक्टर ड्राईव्हर री करून त्यांनी आपला प्रपंच चालवीला आणि त्यानी त्याच्या आयुष्यात अनेक आव्हानांना तोंड दिले आहे.त्यांच्या पत्नी चे 2008 मध्येच अचानक निधन झालं त्या धक्यातून स्वतःला व कुटूंबियांना त्यांनी सावरले.
 - ते त्याच्या लहान मुलासोबत नरवेल ह्या आपल्या गावीच राहणे पसंद करतात . यांना दोन मुली व  मुले आहेत.
मोठा मुलगा श्री विनोद आत्माराम धाडे  हे आयुध निर्मानी भुसावळ  येथे नोकरीतआहेत 
 रक्तदान,अवयव दान विषयी गैरसमज दूर करण्या साठी नेहमी पुढाकार घेणारे 
 श्री विनोद धाडे यांच्या प्रोत्साहनामुळे त्यांचे वडील श्री आत्माराम तोताराम धाडे
 यांनी आपल्या मुलीचा जीव वाचवण्यासाठी किडनी दान करण्यासाठी तयार झाले आणि हा निर्णय त्यांनी डॉक्टरांसमोर व्यक्त केला

 अलका विजय तायडे यांचे आजारपण
 - अलका विजय तायडे यांना 2017 हाता पायाला सूज येणे थकवा हे जाणवत होते परंतु तिथले डॉक्टर योग्य निदान करू शकले नाहीत 2022 पासून त्यांचं क्रिटिनिन अचानक वाढायला  लागून त्यांना उच्च रक्त दाबाचा त्रास वाढला. सुरवातीला अकोला येथे किडनी विकार तज्ञा कडे उपचार केले नंतर जळगाव येथे 
 - त्याच्यावर उपचार केले जात होते, परंतु त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती.
 - डॉक्टरांनी त्यांना किडनी प्रत्यारोपणाचा सल्ला दिला, मात्र त्यांच्यासाठी योग्य डोनर उपलब्ध नव्हता. फेबु 2024 पासून त्याना डायलीसिस सुरवातीला   मेडिकव्हर हॉस्पिटल छ.संभाजीनगर येथे केले 
नंतर बुलढाण्याला आठवड्यातून दोन वेळा डायलीशीस करावे लागत होते.
त्यामुळे सौ. अलकाताई यांची तबेत दिवसनंदिवस खालवत चालली होती.
त्या मध्ये घरी करणारे कोणीच नाही त्यांना दोन मुले एक बाहेर गावी शिक्षणासाठी आहे तर यांच्या घरचे आपली
 नोकरी सांभाळत आहे.
सौ. अलका ताई त्यांचे प्राण वाचविण्यात त्यांच्या वडिलां सोबतच त्यांचा मोठा मुलगा महेश विजय तायडे  याचे खूप योगदान आहे. दवाखान्याच्या कामसोबत च त्याच्या आई च्या जेवणा  पर्यंत सर्व pasient care त्याने एकटया ने पारपाडले.
  दोघांचेही ऑपरेशन दिनांक 19/9/2024ला 
मेडिकव्हर हॉस्पिटल छ.संभाजी नगर येथें झाले 
 डॉ. सचिन सोनी . M. D.
 D N. B (Nephro)
 यांच्या टीम ने 
 यशस्वी किडनी प्रत्यारोपण केले.
 - श्री आत्माराम तोताराम धाडे आणि त्यांची मुलगी दोघेही आता निरोगी असून आपले जीवन सामान्यपणे जगत आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.