आज दिनांक 29 डिसेंबर भुसावळ मधील रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेल सिटी यांनी रेल सिटी रन या मॅरेथॉन स्पर्धेचे नियोजन केले होते.
स्पर्धचे दहा किलोमीटर,पाच किलोमीटर आणि तीन किलोमीटर असे स्पर्धक धावले. स्पर्धेची सुरुवात बाबासाहेब आंबेडकर मैदान येथे होऊन दहा किलोमीटर हॉटेल मधुमंधापर्यंत, पाच किलोमीटर नहाटा चौफुली पर्यंत, तीन किलोमीटर अष्टभुजा मंदिरापर्यंत आणि परत असा मार्ग होता.
या स्पर्धेचे उद्घाटन व बक्षीस समारंभ रोटरी रेल सिटी चे सदस्य व कॅबिनेट वस्त्रोद्योग मंत्री श्री संजय भाऊ सावकारे, ब्रँड अँबेसिडर प्रवीण फालक सर, ओबिनोल फाउंडेशनचे श्री अश्विन परदेसी यांच्या हस्ते करण्यात आले.
देवेंद्र गीते, मयूर कुरकुरे एम एच फिटनेस, राहुल वाघ पोलीस निरीक्षक बाजारपेठ पोलीस स्टेशन, डॉक्टर तुषार पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या स्पर्धेमध्ये दहा किलोमीटर मध्ये संजय भदाणे प्रथम,डॉक्टर तुषार पाटील द्वितीय आणि मुकेश चौधरी यांनी तृतीय क्रमांक मिळवला. डॉक्टर तुषार पाटील यांनी त्यांच्या वाटेचे बक्षीस चौथ्या क्रमांकाच्या निलेश पाटील यांना स्वखुशीने दिले. 40 वर्षावरील प्रथम क्रमांक सीमा पाटील, द्वितीय क्रमांक विना परदेशी,तृतीय क्रमांक स्वाती फालक यांना प्राप्त झाला. दहा किलोमीटर 40 वय खालीलं स्पर्धक बबलू चव्हाण प्रथम, कमलाकर देशमुख द्वितीय,सागर परदेशी तृतीय असे होते. दहा किलोमीटर महिला 40 वर्षाखाली या गटात फक्त एक स्पर्धक होता ते म्हणजे वैशाली कोळी.
पाच किलोमीटर मध्ये प्रथम क्रमांक ग्रँड सिंग चंदेल,द्वितीय क्रमांक दीपक गायकवाड आणि तृतीय क्रमांक दीपक काटकर तर महिलांमध्ये मनीषा गरुडे प्रथम, वैष्णवी कुमावत द्वितीय, तेजस्विनी ढाके तृतीय असा क्रमांक पटकावला.
तीन किलोमीटर मध्ये प्रथम क्रमांक प्रमोद शिरसाट,द्वितीय क्रमांक सुनील बारेला,तृतीय क्रमांक अर्जुन बोयत तर महिलांमध्ये प्रथम क्रमांक ममता कुलकर्णी, द्वितीय क्रमांक पूजा लोधी,तृतीय क्रमांक शीतल परदेशी असा मिळवला. विजेत्यांना रोख बक्षिसे,मोमेंटो आणि पुष्पगुच्छ देण्यात आले.
सहभागी सर्व स्पर्धकांना सर्टिफिकेट आणि मेडल प्रदान करण्यात आले. सर्व स्पर्धकांसाठी सकस आहार उसळ हा नाश्त्यासाठी ठेवण्यात आला होता. याशिवाय महादेव डिस्ट्रीब्युटर्स तर्फे काढलेल्या लकी ड्रॉ मध्ये कोमल तायडे,आदित्य झांबरे, श्रावणी भारंबे,धनंजय पाटील, शिवम मंत्री,शेख तौफिक, अर्चना शिरतुरे,अमोघ चांदवडकर, खुशबू, रेणुका सोनवणे यांना स्मार्ट वॉच, ब्लूटूथ स्पीकर आणि एक मायक्रोवेव्ह ओव्हन असे बक्षिसे मिळाली.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रोटरी रेल सिटी चे अध्यक्ष विशाल शाह,सचिव अनिल सहानी,प्रोजेक्ट चेअरमन उमेश घुले, प्रोजेक्ट को चेअरमन सुयश न्याती,सर्व रोटरी बांधव तसेच ईनरव्हील रेलसिटी,स्पोर्ट्स टीचर असोसिएशन,देवेंद्र गीते एनर्जील वॉटर,रन बडीज टेक्निकल सपोर्ट यांनी परिश्रम घेतले. स्पर्धेत एकूण 650 स्पर्धकांनी भाग घेतला.