Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


भारतीय बौद्ध महासभेतर्फे परभणी घटनेबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन

*भारतीय बौद्ध महासभा जळगाव जिल्हा पूर्व च्या वतीने परभणी विटंबना बाबत राष्ट्रपती यांना निवेदन

जळगांव
दि.२३/१२/२०२४ सोमवार रोजी  भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दल जळगाव जिल्हा पूर्व शाखेच्या वतीने परभणी संविधान प्रतिकृती विटंबना व त्यानंतर झालेल्या कोंबिंग ऑपरेशन चा निषेध व सोमनाथ सूर्यवंशी हत्याप्रकरणी न्याय मिळावा.
    तसेच संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल एकेरी उल्लेख करणारा मनुवादी गृहमंत्री अमित शहा याचा राजीनामा घेण्यात यावा या आशयाचे लेखी निवेदन भारताच्या महामहीम राष्ट्रपती यांच्या उपस्थितीत नावे म. जळगाव जिल्हाधिकारी मा.आयुष प्रसाद यांच्यामार्फत आज दुपारी १=०० वा. जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव या ठिकाणी देण्यात आले.
 जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी बौद्ध महासभेच्या पदाधिकाऱ्यांची स्वतः वार्तालाप करून लेखी निवेदन स्वीकारले. व पुढे वरिष्ठा पर्यंत पोहोचवण्याचे आश्वासनही दिले. सदर निवेदन देताना भारतीय बौद्ध महासभेचे आद. के .वाय. सुरवाडे गुरुजी,( राज्य संघटक) रवींद्र वानखेडे(जिल्हाध्यक्ष) सुशीलकुमार हिवाळे (जिल्हा सरचिटणीस) शैलेंद्र जाधव (जिल्हा कोषाध्यक्ष)बी एस पवार वसंतदादा लोखंडे रमेश साळवे (जिल्हा उपाध्यक्ष) व महिला विभागाच्या प्रियंकाताई अहिरे (जिल्हाध्यक्ष) सुनीताताई वानखेडे (जि.उपाध्यक्ष) वनिताताई साळवे, विद्याताई झनके, ज्योतीताई दाभाडे, प्रकाशजी सरदार (जिल्हा संघटक) सुभाष सपकाळे, जगदीश सपकाळे, श्रावण साळुंखे, संतोष गायकवाड, राजेश इंगळे (जळगाव तालुकाध्यक्ष) अशोक नरवाडे, परमेश्वर जंजाळे,किरण सोनवणे, जयपाल धुरंधर,चंद्रकांत वाघ, विजय तायडे,आनंद निकम, समता सैनिक दलाचे सर्व सैनिक गणवेशात हजर होते. यासह जळगाव तालुका महिला शाखेच्या पदाधिकारी भगिनी व बंधु उपास्थित होते. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.