मनोहर लोणे (प्रतिनिधी )
भुसावल जय गणेश मंदिर सुरभी नगर भुसावळ येथे जय गणेश जेष्ठ नागरिक संघाची साप्ताहिक सभा पार पडली. या सभेत प्रमुख वक्ते श्री नारायण वडदकर यांना आमंत्रित करण्यात आले होते " कर्माचा सिद्धांत " या विषयावर व्याख्यान संपन्न झाले याप्रसंगी प्रथम श्री वडदकर यांच्या शुभहस्ते श्री गणेशाला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.तसेच स्व. मांडाळकर सराच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री राजेंद्र बावस्कर हे होते प्रसंगी श्री नारायण वडदकर यांचा श्रीफळ शाल पुस्तक व स्मृतिचिन्ह व गुलाब पुष्प भेट देऊन सत्कार करण्यात आला. सुविचार वाचन श्री दिनकर जावळे यांनी केले श्री आनंदकुमार पाटील यांनी प्रमुख वक्ते यांचा परिचय करून दिला. त्यानंतर श्री वडदकर यांनी कर्माचा सिद्धांत या अध्यात्मिक विषयावर सोप्या भाषेत मार्गदर्शन केले भगवान श्रीकृष्णानी भगवत गीतेत सांगितले आहे की कर्मगति फार गहन गूढ आहे आपले जीवनच गूढ आणि गुंतागुंतीचे आहे. गोस्वामी तुलसीदास रामायणात सांगतात "कर्म प्रधान विश्व कारे राखा जो कस करई सो तस फल चाखा " हे सर्व विश्व कर्म कायदयाच्या आधारने चालते कर्म म्हणजे क्रिया, काम सकाळ पासून रात्रि पर्यंत करतो त्याला कर्म म्हणतात आपण जे कर्म ज्या भावनेने कराल त्याप्रमानेच ते परत मिळते. त्यांनी कर्माचे तीन प्रकार सांगितले क्रियामाण कर्म, संचित कर्म, प्रारब्ध कर्म जन्मा पासून -मृत्युपर्यंत आपण चांगले वाईट कळत न कळत जी कर्मे करतो ते क्रियामाण कर्म म्हणतात. या कर्मात त्या कर्माचे फळ देऊन शांत होतात दूसरे संचित कर्म जे असे असतात त्याचे फळ पक्व होण्यास वेळ लागतो तोवर ती कच्या रूपात राहते ते संचित कर्म. जीवात्माची अशी संचित कर्म जमा होऊन राहतात ते फळ दिल्याशिवाय समाप्त होत होत नाही. जन्मोजन्मी जमा होत आलेल्या कर्माची फळे या जन्मी, पुढील जन्मी भोगुन संपविल्या शिवाय माणसाची त्या पासून सूटका नाही. हे त्यांनी राजा दशरथ, राजा ध्रुतराष्ट्र यांची उदाहरण देऊन सांगितले. जे संचित कर्म परिपक्व होऊन फळ देण्यास तयार होते त्याला प्रारब्ध कर्म म्हणतात. योग्य वेळी व संधी मिळाल्यावर जेव्हा संचित कर्म फळ देते त्यास प्रारब्ध कर्म म्हणू शकतो.मनुष्य योनित असताना क्रियामान कर्मातील अनेक अपरिपक्व कर्मे संचित म्हणून जमा होत राहतात कालान्तराने फळ देऊन शांत होतात. म्हणून वाइट कर्म करण्यापूर्वी माणसाने हजार वेळा विचार करावा एकदा कर्म केल्यावर त्याचे फळ आज ना उद्या भोगावेच लागते. श्री राजेंद्र बावस्कर यांनी अध्यक्षीय भाषणात सकारात्मक व नकारात्मक कर्माचे परिणाम आपल्या जीवावर कसे प्रवाहित होतात त्यांनी राजाचे उदाहरण देऊन सांगितले सभेचे सूत्र संचालन सचिव ज्ञानदेव इंगळे यांनी केले श्री सुरेश पाचपांडे यांनी आभार प्रदर्शन केले.या सभेचे छायाचित्रण डी एस पाटील यांनी केले.पसायदान आणि राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कार्यकारिणी व सर्व सदस्यानी सहकार्य केले