थोरगव्हाण पंचायत समिती, भुसावळ (जळगाव रोड ) येथील स्वमालकीच्या जागेवर लेवा पाटील थोरगव्हाणकर समाज हॉलचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे.
RCC फाऊंडेशनसह नवीन स्ट्रक्चरनुसार या हॉलच्या उभारणीची सुरुवात करण्यात आली.
या प्रकल्पाची सुरुवात अध्यक्ष दिनेश पाटील यांच्या कार्यतत्परतेमुळे शक्य झाली आहे .
समाजहिताच्या दृष्टीने या हॉलचा उपयोग विविध सांस्कृतिक, सामाजिक, व शैक्षणिक उपक्रमांसाठी होणार आहे. या ठिकाणी समाजबांधवां साठी एकत्र येण्याचे केंद्र उपलब्ध होईल. या महत्त्वाच्या उपक्रमामुळे थोरगव्हाणकर लेवा पाटील समाजाच्या प्रगतीला चालना मिळेल, तसेच भविष्यात अनेक उपक्रम राबवता येतील.
हे कार्य प्रगतीपथावर असून, लवकरच हॉल पूर्णत्वास येईल अशी अपेक्षा आहे. भुसावळ येथे वास्तव्यास असलेले समाज बांधव यांना छोटे मोठे इन्हेंट सेलिब्रेट करण्यासाठी आधार होईल म्हणून समाज बांधव आनंद अभिनंदन व्यक्त करत आहे .