Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


थोरगव्हाण हायस्कूल मध्ये कै धोंडू सखाराम देशमुख यांची जयंती साजरी

थोरगव्हाण येथे डी .एस . देशमुख विद्यालयात धोंडू सखाराम देशमुख यांची जयंती कृतज्ञ भावनेने संपन्न 


थोरगव्हाण तालुका रावेर येथिल दि एज्युकेशन सोसायटी थोरगव्हाण (स्थापना 1917 ) संचालित डी एस देशमुख हायस्कुल थोरगव्हाण येथे  दि 10/12/2024 मंगळवार रोजी दानशूर  व अभ्यासू व्यक्तिमत्व कै धोंडू सखाराम देशमुख,  तालुका यावल यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली . 
 विद्यालयात थोर समाज सुधारक संस्थापक कै तापीराम भगवान चौधरी,दानशूर व्यक्तिमत्व कै लक्ष्मण मुकुंदा पाटील  ,कै धोंडू सखाराम देशमुख व कै आसाराम  तिमा चौधरी आणि कै गंगाधर पांडुरंग देशमुख यांच्या प्रतिमा ठेवून दीप प्रज्वलन केले व सर्वांच्या प्रतिमांना मनोभावे पुष्पहार अर्पण करून त्यांच्या   गौरव कार्याचा  उपस्थितांना परिचय करून देण्यात आला .
 प्रास्ताविक मुख्याध्यापक एस एस वैष्णव यांनी केले . 
कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा संस्थेचे विद्यमान अध्यक्ष  चंद्रकांत जनार्दन चौधरी यांनी अध्यक्षस्थान भूषविले .
 याप्रसंगी संस्थेचे  उपाध्यक्ष  उमाकांत  बाऊस्कर संचालक शालेय समिती सदस्य मधुकर कोल्हे , संचालक नंदकुमार चौधरी ,  संचालक चंद्रकांत पाटील , संचालक रविंद्र चौधरी . शाळेला नाव असलेले कै धोंडू सखाराम देशमुख यांचे वंशज  पणतू  माजी अध्यक्ष तथा संस्थेचे आजीव संचालक  चंद्रकांत गंगाधर देशमुख व सौ.  सुनंदाताई  चंद्रकांत देशमुख सपत्नीक उपस्थित होते .  
 चंद्रकांत  देशमुख यांनी संस्थेची  स्थापना झाल्या पासूनची पार्श्वभूमी इतिहास  सांगितला . संस्थेला दहा हजार रुपयाची देणगीची घोषणा केली .
 एम के पाटील यांनी चंद्रकांत देशमुख यांनी दिलेली लिखित माहिती संदेश प्रकट वाचन केला .
 संस्थेचे अध्यक्ष  चंद्रकांत  चौधरी यांनी अध्यक्षीय भाषणात  चारही दानशूर दात्यांचा व समाज सुधारकांच्या सामाजिक शेक्षणिक कार्याबाबत ऋण व्यक्त केले . दिलेल्या देणगीचा विद्यार्थी  हितासाठी विनियोग केला जाईल याची ग्वाही दिली .
श्री चंद्रकांत  देशमुख सौ सुनंदातताई चंद्रकांत देशमुख यांनी  संस्थेसाठी दहा हजार रुपयांची देणगी देण्याची घोषणा केली .
 श्री वाय जे कुरकुरे यांनी सूत्र संचालन केले व सौ जे पी चौधरी यांनी उपस्थितांचे आभार मानले . सर्व शिक्षक बंधु भगिनी शिक्षकेतर कर्मचारी बांधव विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते . विद्यार्थ्यांना चॉकलेट वाटप करून कार्यक्रमाची  सांगता करण्यात आली .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.