शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रभाग क्रमांक सात भुसावळ येथे आरोग्य शिबर व ज्येष्ठ नागरिक यांचा सन्मान सोहळा संपन्न झाला
पद्मविभुषण मा खा शरद पवार यांच्या 84व्या वाढदिवसाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष भुसावळ तालुक्याच्या वतीने ऍड रवींद्र भैय्यासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली भुसावळ येथे 84 ज्येष्ठ नागरिक यांचा सन्मान सोहळा व आरोग्य तपासणी शिबीर सोहळा सपन्न झाला. यावेळी पक्ष चिन्हाचा केक 90 वर्षांचे सोनवणे काका यांच्या हस्ते कापून कार्यक्रमाची सुरवात केली. याप्रसंगी पवार साहेब यांची राजकीय सामाजिक कारकीर्द लोकसेवेतच झाली अनेक धोरणत्मक निर्णय घेत शेतकरी ,उद्योग व्यवसाय , सरकारी कर्मचारी, महिला सक्षमीकरण, सहकार क्षेत्र याबाबत पवार साहेबांचे निर्णय महाराष्ट्र तथा देश हिताचे व विकासाचे ठरले मात्र ज्यांची लायकी नाही असे लोक पवार साहेबांवर खालच्या भाषेत टीका करतात असे वाय आर पाटील सर यांनी मांडले तर पवार साहेबांची कामे विचार लोकांपर्यंत आपल्या नातवंड व पुढच्या पिढीला समजावून सांगण्याचे आवाहन जतीन मेढे सर यांनी सत्कारार्थी ज्येष्ठ नागरिकांना केले.
अध्यक्षीय मार्गदर्शन करताना रवींद्र भैय्या यांनी पवार साहेबांचे महाराष्ट्र जडणघाडणीत मोठे योगदान असून तुमचे आशीर्वाद साहेबांच्या पाठीशी राहू द्या असे प्रतिपादन केले. यां प्रसंगी नाना विविध घटकातील 84 ज्येष्ठ नागरिक यांची आरोग्य तपासणी डॉ राजेश मानवतकर यांनी केली तर , नाना पवार , दिपक मराठे , शकील पटेल , पी पी पाटील , तुकाराम बावस्कर , भीमराज कोळी , राजू भोई , मिलिंद उंबरकर , विजय पाटील , प्रशांत तायडे , कुणाल जंगले , विशाल नारखेडे , विजय भंगाळे, विवेक सपकाळे, अक्षय पवार,राजू कोळीआदी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन के यू पाटील सर यांनी केले तर आभार विशाल ठोके यांनी मानले.