मुख्य अभियंता व उप मुख्य अभियंता (प्रशासन) यांना कोर्टात खेचणार __ अरुण दामोदर
भारतीय संविधान, शासकीय नियम, कायदे धाब्यावर बसवून दीपनगर महानिर्मिती कंपनी मालकीची असल्या सारखी मानसिकता असणाऱ्या मुख्य अभियंता व उप मुख्य अभियंता (प्रशासन) यांना कोर्टात कोर्टात खेचणार आल्याचे युनियनचे नेते अरूण दामोदर यांनी आज झालेल्या द्वार सभेत सांगितले आहे .
सुरक्षा विभागातील कंत्राटी कामगाराचे आर्थिक सोषण है अधिकारी करीत असल्याच्या निषेधार्थ कमगार गेल्या अठरा दिवसापासून आंदोलन करीत आहेत .
आज सर्व कामगारांनी काळ्या फित्या लाऊन काम केले या निमित्त झालेला सभेत ते बोलत होते या वेळी कमगार मोठया संख्येने उपस्थित होते