Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


ज्येष्ठांचा सहवास सुवर्णा सारखा - उज्जैनकर यांचे मत

ज्येष्ठांचा सहवास सुवर्णा सारखा असतो..... डॉ. शिवचरण उज्जैनकर

जय गणेश मंदिर सुरभी नगर भुसावळ येथे जय गणेश जेष्ठ नागरिक संघाची साप्ताहिक सभा पार पडली. 
या सभेत प्रमुख वक्ते  डॉ. शिवचरण  उज्जैनकर यांना आमंत्रित करण्यात आले होते." ज्येष्ठांचे सामाजिक योगदान" या विषयावर व्याख्यान संपन्न झाले 

याप्रसंगी प्रथम डॉ. उज्जैनकर यांच्या शुभहस्ते श्री गणेशाला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.तसेच स्व. मांडाळकर सराच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री राजेंद्र बावस्कर हे होते प्रसंगी   डॉ. उज्जैनकर यांचा श्रीफळ शाल पुस्तक व स्मृतिचिन्ह व गुलाब पुष्प भेट देऊन सत्कार करण्यात आला तर ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव श्री ज्ञानदेव इंगळे यांनी डॉ. उज्जैनकर यांचा परिचय करून दिला. त्यानंतर डॉ. उज्जैनकर यांनी आपल्या एक तासाच्या अनुभव संपन्न व्याख्यानात संत, ऋषी मुनी आणि हुतात्म्यांना प्रथम वंदन केले  ते पुढे म्हणाले की,ज्येष्ठांचा सहवास हा सुवर्णा सारखा असतो प्रत्येकाच्या घरोघरी ज्येष्ठ हे असावेत त्यामुळे घर शोभिवंत व सुसंस्कारित दिसते ज्यांच्या घरी ज्येष्ठ आहेत तेच घर खरे श्रेष्ठ  आपण ज्येष्ठ आहात आपल्याला अनुभव फार आहे हा अनुभव समाजासाठी अत्यंत महत्त्वाचा असून नवी पिढी निर्माण करण्यासाठी हा सहवास सुवर्णासारखा असतो पैशापेक्षा माणसाला किंमत द्या चांगली माणसे जोड़ा आणि ज्येष्ठांना आतापर्यंत जे अनुभव आलेत ते त्यांनी अनेक सुखदुःख पाहिलीत, झेललित आणि सहन सुद्धा केलीत हा अनुभव समाजासाठी नक्कीच फायद्याचा आहे.बाल, किशोर युवा यांच्यावर संस्कार घडवण्याचे काम जेष्ठच करू शकतात यात शंकाच नाही असेही उज्जैनकर यांनी समाजातील विविध उदाहरणे देऊन पटवून दिले स्वतासाठी जगता जगता दुसऱ्याचे अश्रु पुसायचे आणि सत्कर्म करायला जेष्ठ शिकवतात.प्रसंगी डॉ. उज्जैनकर यांच्या व्याख्यानाला  उपस्थित ज्येष्ठांनी टाळ्या वाजवून दाद दिली. प्रसंगी ७५ ते ७६ ज्येष्ठ नागरिक  उपस्थित होते.  संघाचेअध्यक्ष श्री राजेंद्र बावस्कर यांनी आपले मनोगत व्यक्त केले समाज कसा सुसंस्कृत यासाठी आम्ही सर्व जेष्ठ विचाराची देवानघेवाण साप्ताहिक सभेच्या माध्यमातुन करत असतो. आजचा सुविचार दिलीप तिड़के यांनी सांगितला सभेचे सूत्र संचालन संघाचे सचिव ज्ञानदेव इंगळे यांनी केले.ज्येष्ठ नागरिक संघाच्या उपाध्यक्ष डॉ. सुधाताई खराटे यांनी आभार प्रदर्शन केले.या सभेचे छायाचित्रण डी एस पाटील यांनी केले.पसायदान आणि राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शांताराम बोबडे व सर्व सदस्य यांनी सहकार्य केले

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.