Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


जय गणेश जेष्ठ नागरीक संघातर्फे जेष्ठां साठी हाडांचे आरोग्य प्रबोधन संपन्न


जय गणेश मंदिर सुरभी नगर भुसावळ येथे जय गणेश जेष्ठ नागरिक संघाची साप्ताहिक सभा पार पडली. 

या सभेत लोकमान्य टिळक हॉस्पिटल पुणे येथील मेडिकल डायरेक्टर   डॉ. श्रीकृष्ण जोशी यांना आमंत्रित करण्यात आले होते." जेष्ठाचे हाडाचे व सांध्याचे आरोग्य " या विषयावर व्याख्यान संपन्न झाले याप्रसंगी प्रथम डॉ. श्रीकृष्ण जोशी यांच्या शुभहस्ते श्री गणेशाला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.

तसेच स्व. मांडाळकर सराच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री राजेंद्र बावस्कर हे होते प्रसंगी   डॉ. श्रीकृष्ण जोशी यांचा श्रीफळ शाल पुस्तक व स्मृतिचिन्ह व गुलाब पुष्प भेट देऊन सत्कार करण्यात आला तर ज्येष्ठ नागरिक संघाचे  श्री रामचंद्र बावस्कर यांनी प्रमुख वक्ते यांचा परिचय करून दिला.

 त्यानंतर डॉ श्रीकृष्ण जोशी यांनी भाषणाची सुरुवातीला तुमच्या सभागृहात   विघ्नहर्ता असल्यामुळे आपणास समस्या येणार नाही. तुमची पीढ़ी ही शेवटची हसणारी पीढ़ी आहे. आज त्रिपुरारी पौर्णिमा आहे कार्तिकेचा जन्मदिवस पुढे म्हणाले ज्योत नाही बाळासमोर माय नाही दुधाला साय नाही जीवाभावाची सांगावी तशी उरली नाही नाती ही नाती जिथे आहेत तिथेच फक्त संवाद   मिळतो वयानुसार होणारे परिणाम स्वीकारा सांध्याचे मुख्य अवयव खांधा, कोपर, हिप जॉइंट, गुड़गे जॉइंट आणि एंकल जॉइंट मनुष्य एकमेव असा प्राणी आहे तो दोन पायावर चालतो  प्रत्येकाचे आकारमान वेगवेगळे असल्यामुळे होणारे आजार पण वेगळे असतात एंकल व गुढघा यावर वजन येते उठताना गुढघ्यावर नऊ पट आपल्या वजनाचा भार पडतो स्थूलपणा हा पहिला धोका असून सांधे कुरकुरायला लागले की,डॉक्टर कडे जावे. वर्षातून एकदा बीपी शुगर डोळे नियमित तपासा       तपासन्या  नार्मल आल्यातर आनंदाने हसा तसेच हाडाची घनता तपासा प्रिवेंशन आणि डिटेक्शन जरुरीचे आहे स्टेरोइड हे दुधारी शस्त्र असून ते हाडाची झीज वाढवते. नंतर            कालांतराने तीव्र वेदना होतात या दुखापती   दूर्बीणीद्वारे बऱ्या करता येतात व कार्यक्षमता वाढवता येते जर हातात पायात मुंग्या येत असतील तर तो मनक्याचा समस्यामुळे तर त्याचा सी टी स्कैन करावा रोबोट सर्जरी ही आधुनिक असून सर्जरीनंतर दुसऱ्या दिवशी चालू शकतात हाइड्रोथेरपी मुळे पायाचे स्नायु बळकट होतात या व्याख्यान्यादरम्यान सदस्यानी विविध शंका, प्रश्न विचारले त्याचे निरसन केले. खाली बसु नका पायात जोपर्यंत ताकद आहे तोपर्यंत चालत रहा हलकासा व्यायाम करत रहा साधारण रोबोट सर्जरीसाठी दोन्ही गुढग्याला 1.75 लाख ते 4 लाख पर्यंत खर्च येतो. अंतरराष्ट्रीय रोबोट प्रसंगी डॉ. जोशी यांच्या व्याख्यानाला  उपस्थित ज्येष्ठांनी उत्तम प्रतिसाद दिला प्रसंगी 100 ते 120ज्येष्ठ नागरिक  उपस्थित होते.  संघाचेअध्यक्ष श्री राजेंद्र बावस्कर यांनी आपले मनोगत व्यक्त केले .
सभेचे सूत्र संचालन संघाचे सचिव ज्ञानदेव इंगळे यांनी केले.ज्येष्ठ नागरिक संघाच्या उपाध्यक्ष डॉ. सुधाताई खराटे यांनी आभार प्रदर्शन केले.
या सभेचे 
पसायदान आणि राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. 
या कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शांताराम बोबडे शालीग्राम  पाचपांडे  , प्रकाश वारके व सर्व सदस्यानी  सहकार्य केले

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.