Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


वरणगांवच्या उमेदवाराला विधान सभेत संधी दयावी प्रतिभा जगदाळे


आतापर्यंत बोदवड, मुक्ताईनगर व भुसावळ येथीलच लोक आमदार म्हणून आपल्याला लाभलेली आहेत. परंतू वरणगाव व परीसरातील गावांचा व खेड्यांचा पाहिजे तसा विकास व प्रगती झालेली नाही. सुख-सुविधा नाहीत. पाणी पुरवठ्याचा प्रश्न सुटलेला नाही.गावातील व खेड्यातील रस्ते, गटारी,संडास व मुताऱ्यांचा आणि  स्वच्छतेचा प्रश्न सुटलेला नाही. दिवसेंदिवस  बेरोजगारीच्या समस्या वाढतच आहेत.तशातच महागाईचा भस्मासुर दिवसेनदिवस वाढतच चाललेला आहे. शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नाही. 

आतापर्यंत आपण निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधी आमदार, खासदार हे निवडणुकांच्या काळात येऊन मोठमोठ्या सभा घेऊन, मोठमोठी पोकळ आश्वासने निवडून जातात.त्यानंतर कधी तोंड दाखवायला किंवा भेटीगाठी सुद्धा येत नाहीत. आलेच तर लहान,मोठ्या कामांच्या उदघाटनांच्या कार्यक्रमांना येतात. कुण्या सामान्य लोकांच्या किंवा गावाच्या,गावकऱ्यांच्या समस्या ऐकायला ह्यांना वेळच नसतो. फक्त निवडणूकांच्या काळात वेळ देतात, समस्या ऐकतात व पोकळ आश्वासने देऊन निघुन जातात.

म्हणून आता वरणगावातीलच आमदार हवा आहे.

त्यासाठी वरणगावातील सामान्य कुटुंबातील, हिंदू मातंग समाजाच्या सुशिक्षित D Ed झालेल्या,गोरगरीबांची,कामगारांची, शेतमजूरांची व हातमजूरांची जाण असलेल्या सौ.प्रतिभाताई सुजीत जगदाळे. मनमिळावू ,शांत व प्रेमळ स्वभावाच्या ह्या वरणगाव शहर व परीसरातील विधानसभेत आमदारकी साठी  निवडणूक लढणाऱ्या ह्या  एकमेव पहिल्या महिला उमेदवार भुसावळ अनु.जाती.राखीव मतदार संघातून  विधानसभेच्या. निवडणुकीत अपक्ष उमेदवारी घेऊन निवडणूक लढवित आहे. याचा सर्व वरणगाव व परीसरातील लोकांसाठी गर्वाची व अभिमानास्पद बाब आहे. त्या ऐंशी टक्के समाजकारण व विस टक्के राजकारण करून भुसावळ तालुक्याचा व परिसरातील गावांचा विकास व प्रगतीची कामे करण्यासाठी त्या " शिटी " निशाणी घेऊन निवडणूकीच्या रिंगणात उतरलेल्या आहेत. तरी आपण मतदान रूपी आशिर्वाद देऊन अनु क्र. 7 *" शिटी "* ह्या ( निशाणी ),चिन्हासमोरील बटन दाबून भरघोस मते देऊन प्रचंड  बहूमतांनी विजयी करा.व आपल्या सर्वांच्या सेवेची एक संधी द्या. अशी विनंती प्रतिभा जगदाळे यांनी केली आहे .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.