Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


भुसावळ ते कचनेर पदयात्रेचे आयोजन




भुसावळ ते कचनेर पदयात्रा* चे आयोजन करण्यात आले आहे 

5 नोव्हेंबरला पहाटे विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केलेले असून सर्वप्रथम भगवंताचे अभिषेक व पूजा, आरती ,प्रार्थना, उद्घाटन समारोह , ध्वजारोहण, वृक्षारोपण, यात्रा आशीर्वाद एवं मांगलिक श्रवण पूर्ण करून, त्यानंतर पदयात्रेस मार्गस्थ करण्यात येईल.

पदयात्रा  5 नोव्हेंबर रोजी  सकाळी 6.40 मि. वाजता दिगंबर जैन मंदिर आठवडे बाजार भुसावळ येथून सुरू होऊन चोरवड- जामनेर- अजंठा- सिल्लोड- फुलंब्री- सावंगी फाटा मार्गे श्री चिंतामणी 1008 पार्श्वनाथ भगवान, कचनेर येथे 11 नोव्हेंबर सोमवार रोजी संध्याकाळी समारोप होईल.

तरी पदयात्रेत आपले नाव नोंदणी करण्या करिता भुसावळ नोंदणी व संपर्क प्रमुख रुपेश गोधा, विकास गोधा,जय दोशी, गजेंद्र रुईकर व चेतन जैन हेमावत यांना संपर्क करावा असे आवाहन पदयात्रेचे प्रायोजक, कासलीवाल परिवार, गोधा परिवार व डोशी परिवार, भुसावळ यांनी केले आहे.

तरी सर्व सकल जैन समाज बांधवांनी, जास्तीत जास्त संख्येत उपस्थित राहून पदयात्रेकरूना आशीर्वाद, शुभेच्छा व अनुमोदना देण्याकरीता उपस्थित राहावे, असे आवाहन सकल जैन समाज, दि.जैन युवा मंच,जैन युवा ग्रुप, राष्ट्रीय जैन सेना भुसावळ यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.