[सतीश पाटील भडगाव तालुका प्रतिनिधी ]
चोपडा येथील दिपक गुजराथी यांच्या आपल्या मुलीच्या घरी शिंदखेडा येथे दि १३,रोजी रात्री वृद्धपकाळाने मृत्त्यु झाला.ते गेल्या दोन महिन्यांपासून आजारी होते.
त्यांना एकच मुलगी नेहा परेश शाह असुन ती लग्न होऊन शिंदखेडा येथे वास्तव्यास आहे.या ठिकाणी आपल्या वडीलांना घेऊन मुलगी नेहा ही वडीलांची सेवा करीत होते.यात तिला सासु मालतीबाई शाह,पती परेश शाह यांची साथ मिळत होती.दि
१३रोजी रात्री प्राण सोडला.
दि.१४रोजी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.मुलगा नसल्याने मुलीनेच अग्निडाग दिला.मुलीनेच तिरडी पकडत सर्व विधी केला.मुलगा काय आणि मुलगी काय असा कुठलाही दुजाभाव न करता अग्नीडाग दिला. सर्व धार्मिक विधी देखील मुलगी नेहा शाह हीच करणार आहे .
समाजातील पुरुष ,महिला भेदाभेद दुर होण्यासाठी हे पाऊल उचलले असल्याचे मुलगी नेहा परेश शहा सांगत वडीलांची सेवा मी केल्याने त्याचे पुण्य देखील मलाच मिळावे यासाठी मी अग्निडाग देण्याचा निर्णय घेतला यासाठी माझे सासरचे सासु मालती शाह,पती परेश शाह,यांनी प्रोत्साहन दिले.