Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


वरणगांव येथील देशमुख गल्लीत बाल गोपाळांनी पन्हाळ गडाची उत्कृष्ठ कलाकृती केली सादर


    वरणगांव येथे देशमुख गल्लीत  बालगोपालांनी दिवाळीनिमित्त केली पन्हाळगडाची निर्मिती

     सालाबादाप्रमाणे यावर्षीही रणगांव  येथील दुर्गवीर संघटना देशमुख गल्ली याच्या माध्यमातून आज दिवाळी निमित्त किल्ले पन्हाळ गड तयार करण्यात आला होता .
अतिशय सुंदर असा पन्हाळगडावर बुरुज , मावळे छत्रपती शिवरायांचा पुतळा शिवकालिन इतिहास सांगणार्‍या सर्व साहित्याची उत्कृष्ठ कलाकृती साकारण्यात आली होती . वरणगांव मधील नागरीक किल्ला पाहण्यासाठी येत होते व कार्यकर्ते त्यांना समजावुन सांगत होते .
 प्रस्तुत उपक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी दुर्गवीर संघटनेचे प्रमुख भूषण देशमुख, संतोष देमुख, निलेश देशमुख, विजय माळी, अमोल देशमुख, दर्शन महाजन, रुद्र देशमुख, रुद्रकेश देशमुख, युक्ता देशमुख, पियूष देशमुख, आदित्य देशमुख, अमित देशमुख, देविका देशमुख, यशस्वी महाजन, परी काकांनी, सोमेश्वर देशमुख, युगांती देशमुख, रामेश्वरी देशमुख, सोहम देशमुख यांनी परिश्रम घेतले त्यांना मार्गदर्शन  विलासराव देशमुख, पांडू महाजन, भिमराव देशमुख यांनी केले . 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.