ईनरव्हील रेलसिटी ने तापी पुलाच्या रेलिंग ला लावले रेडियम स्टिकर्स .. (वाहतूक सुरक्षेबाबत आगळावेगळा उपक्रम ).
सध्या थंडीचे दिवस सुरू झाले आहे .या काळात लवकर अंधार पडतो व बऱ्याच वेळा धुके सुद्धा असते अश्या काळात रात्रीच्या वेळी वाहन चालवणे जिकिरीचे असते .
भुसावळ येथील तापी नदीचा पूल जवळपास 1किमी लांबीचा आहे आणि त्याच्या रेलिंग वर रेडियम फार क्वचित ठिकाणी असल्याने रात्रीच्या वेळेस पुलाचा कठडा सहजासहजी लक्षात येत नव्हता .म्हणून काल दि 3नोव्हेंबर रोजी ईनरव्हील क्लब ऑफ भुसावळ रेलसिटीने तापी पुलाच्या रेलिंग ला रेडियम स्टिकर्स लावले .या मुळे रात्रीच्या वेळेस वाहनांच्या प्रकाशात रेडियम चमकून वाहनांचा अपघात किंवा दुर्घटना टळण्यास मदत होणार आहे असे मत ईनरव्हील अध्यक्षा रेवती मांडे यांनी या वेळेस व्यक्त केले .या प्रोजेक्ट साठी सुनिताताई पाचपांडे,मोना भंगाळे,प्रतीक्षा पाटील ,आरती पाटील ,किरण पोलदिया या सदस्यांनी परिश्रम घेतले .