Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


बी आर एस चे गुलाबी वादळ धरणगांवात अनेकांचा पक्ष प्रवेश

*धरणगाव शहरात BRS पक्षाचे गुलाबी वादळ.*
*जिल्हाध्यक्ष लकी अण्णांच्या उपस्थितीत प्रवेश : जळगाव ग्रामीण मध्ये प्रवेशाचे सत्र सुरूच* 

धरणगाव , दिनांक 10 नोव्हेंबर (  ) येथील शहरातील युवक आणि जेष्ठ नागरिकांनी भारत राष्ट्र समिती म्हणजेच BRS पक्षात जिल्हाध्यक्ष लक्ष्मण गंगाराम पाटील ऊर्फ लकी अण्णा यांचे प्रमुख उपस्थितीत प्रवेश केला. 

फैजान भाई मोमीन, शेरखान यूसुफ खान बेलदार, आसिफ खान अस्लम खान बेलदार, अजहरुद्दीन समसुद्दीन बेलदार, सय्यद जमील सय्यद आमीन, मुतल्लीम शेख अकील, राजेंद्र काशिनाथ बडगुजर यानी प्रवेश केला. 

यावेळी BRS पक्षाचे गुलाबी रुमाल आणि माहिती पुस्तिका देवून जिल्हाध्यक्ष लकी अण्णा यानी स्वागत केले. यावेळी तालुकाध्यक्ष जगन्नाथ महाजन,ओंकार माळी,कालू भैय्या मोमीन,भावसिंग सोनवणे,एकनाथ पाटील, आकाश बडगुजर, जिल्हाध्यक्ष यांचे PS स्वामी पाटील, विजय पाटील यावेळी उपस्थित होते. 

बीआरएस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव म्हणजेच केसीआर साहेबांचे शेतकरी आणि गोर गरीब जनतेच्या हितासाठी असणारी दूरदृष्टी असे नेतृत्व यावर विश्वास ठेवत तसेच प्रभारी श्री वामशीधरराव , प्रदेश प्रमुख माणिकराव  कदम,  उत्तर महाराष्ट्र समन्वयक नानासाहेब बच्छाव यांचे मार्गदर्शनात आता लोकांना परिवर्तन हवे आहे. असे सांगत शेतकरी आणि गोर गरीब जनतेच्या प्रलंबित समस्या सोडविण्यास सरकारची असणारी उदासीनता याला पर्याय म्हणून आता बीआरएस पक्षात  प्रवेश होत आहेत. आगामी निवडणुकीत आता बीआरएस पक्षाचा गुलाबी झेंडा नक्कीच फडकेल असा ठाम विश्वास यावेळी जिल्हाध्यक्ष लक्ष्मण गंगाराम पाटील लकी अण्णा टेलर यांनी व्यक्त केला. तसेच शेतकरी तरुण बांधवांनी आता केसीआर साहेबांचे नेतृत्वात आता पक्षात स्वागत आहे असे देखील ते यावेळी म्हणाले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.