Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


चोरवड येथे ग्रामस्थांनी व प्राणी मित्रांनी वाचविले निलगायीचे प्राण


कुत्र्याच्या तावडीत सापडलेल्या गंभीर जख्मी नील गाईच्या पिल्लाला चोरवड गावकऱ्यांनी व प्राणीमात्रांने दिले जीवनदान 
     याबाबत सविस्तर घटना अशी की चोरवड परिसरातील जंगलात परिसरात मोठ्या प्रमाणावर नीलगाईंचा कळप असतो अन्नभटकंती साठी कळपा पासुन नील गाईचे लहान पिल्लु रात्री 7 वाजता रस्ता भरकटले गावा जवळ आल्याने मोठ्या प्रमाणावरील कुत्र्यांनी त्या पिल्लाला घेरत शरीराचे लचके तोडले होते
    कुत्रे सदर वासराला गंभीरपणे जख्मी करु लागले होते , चोरवड गावातील मंडळींना हरणाचे पिल्लु वाटल्याने त्यांनी स्वतःच्या जीव धोक्यात घालून पोलीस पाटील श्री सचिन ठाकरे च्या मदतीने त्या पिल्लुला सुखरूप वाचविले
 हिरा मारोती मंदीरातील गोमातेचा डॉक्टरांच्या मदतीने उपचार करुन घरी येत असता गावातील मंडळींनी शहरातील गोरक्षक प्राणीमित्र रोहित महाले ना फोन केला
 वेळ न गमावता थेट घटनास्थळ गाठत वनविभागाचे श्री गोकुळ चौधरी श्री नरेंद्र काळे श्री संदीप बारी यांच्याशी संम्पर्क केला असता वनविभाग कुर्हा पानांचे येथे उपचारासाठी नेत डॉ भरत महाजन साहेबांनी उपचार केला व गावकरांची हिंम्मत कामी आली त्या पिल्लुला जीवदान मिळाले आहे 
 शहरातील श्री दिपक नाटेकर अवनी बहुउद्देशीय संस्था व श्री विजय रायपुरे यांचे देखील आभार मानले आज सकाळी नऊ च्या सुमारास बारा नंबर जंगलात त्याला सोडले या उत्कृष्ट कार्याबद्दल चोरवड गावांचे वनविभागाने मानले आभार प्रत्येक माणुस मुका जीव वाचवुन शकतो फक्त मनात जिद्द असावी असे आवाहन वनविभागाने केलेले आहे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.