Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


पाचोरा तालुक्यातील सार्वे पिप्री शिवारात शेतकऱ्यां मध्ये बिबट्याची दहशत

कजगाव ता.भडगाव येथुन जवळच असलेल्या सार्वे ता.पाचोरा येथे सार्वे पिंप्री दरम्यान ब्रेक के बाद पुन्हा बिबटया चे दर्शन झाल्याने  ग्रामस्था सह शेतकरी शेतमजूर मध्ये घबराट पसरली असुन वन खात्यास तक्रार देताच वन अधिकाऱ्यांनी भेट देऊन पहाणी केली असता बिबट्या चे ठसे मिळुन आल्याने शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे आवाहन वनविभागाने केले आहे 
  येथुन जवळच असलेल्या सार्वे ता.पाचोरा येथे गेल्या दि.१ सप्टेंबर पासुन बिबट्या चे दर्शन होत आहे दि.१४ सप्टेंबर रोजी  राजेंद्र पंडीत पाटील यांच्या गायीवर बिबटया ने हल्ला करून  ठार केले होते गेल्या १ सप्टेंबर पासुन ब्रेक के बाद सार्वे, पिंप्री व कजगाव शिवारात बिबटया शेतकऱ्यांना अनेक वेळेस नजरेस पडत आहे या अगोदर देखील बिबटया ने काहि डुक्कर व कुत्र्याची शिकार केली आहे दि.९ रोजी रात्री  सार्वे पिंप्री शिवारात पुन्हा बिबट्या चे दर्शन झाल्याने शेतकरी बांधव सह मजुर वर्गात घबराट पसरली आहे बिबटया दिसल्या बाबतची माहिती पाचोरा वनविभागास कळविल्या नंतर दि.१० रोजी  वनक्षेत्रपाल हर्षल मुलाणी सह वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी भेट देऊन पहाणी केली असता बिबट्या चे ठसे मिळुन आल्याने शेतकऱ्यांनी व ग्रामस्थांनी काळजी घेण्याचे आवाहन वनविभागाने केले
प्रसंगी ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते
प्रतिक्रिया 
सार्वे येथुन फोन आल्याने येऊन पहाणी केली असता सदर ठीकाणी बिबट्या चे ठसे मिळुन आले सदर बिबटया कुत्रा एवढा असुन तो या भागात मेंढ्या आल्या असल्याने त्यांच्या मागे तो आल्याची शक्यता  मुलाणी यांनी व्यक्त केली  असुन मेंढपाळ यांना पुढे जाण्यासाठी सुचना दिल्या आहेत

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.