Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


भुसावळ येथे इनरव्हील रेलसिटी क्लबतर्फे कुमारिका पुजन कार्यक्रम संपन्न

भुसावळ येथे ईनरव्हील रेल सिटी ने  नवरात्री मध्ये केले कुमारीका पूजन उत्साहात संपन्न झाले .
  नवरात्री उत्सवात कुमारिका पूजनाचे अनन्यसाधारण महत्व आहे .या उत्सवात नारी ला देवता समजून संपूर्ण समाज पूजन करत असतो. याद्वारे आपल्या  पूर्वजांनी नारीचा सन्मान केला पाहिजे ही शिकवण दिलेली आहे .हा दृष्टिकोन लक्षात घेऊन ईनरव्हील क्लब ऑफ भुसावळ रेलसिटीने कुमारीका पूजनाचे आयोजन केले .क्लबने दत्तक घेतलेल्या न पा शाळा क्र 2,जुना सातारा ,भुसावळ येथील विद्यार्थिनींचे कुमारिका पूजन केले .
यात मुलींना त्यांचे पूजन केल्यावर नवीन ड्रेस ,डोक्याचा बेल्ट ,सौंदर्य प्रसाधने ,शालापयोगी साहित्य भेट म्हणून देण्यात आले .
यासाठी आर्थिक सहाय्य डॉ मृणाल पाटील यांनी केले तर आयोजनासाठी नरेंद्र कोळी सर ,ईनरव्हील अध्यक्षा रेवती मांडे ,सचिव सीमा सोनार ,सुनीता पाचपांडे,योगिता वायकोले ,कविता पाचपांडे,कोमल पाटील यांनी परिश्रम घेतले .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.