Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


कापूस उत्पादन वाढी साठी सघन तंत्रज्ञानाचा वापर करावा तज्ञांचा सल्ला

कापूस उत्पादन वाढीकरिता शेतकऱ्यांनी सघन लागवड तंत्रज्ञानाचा उपयोग करावा – डॉ.बाबासाहेब फंड
अंतरगाव येथे कृषी विज्ञान केंद्र दुर्गापुर तर्फे कापूस सघन लागवड कार्यशाळेचे आयोजन.
अमरावती दि. (प्रतिनिधी) - भारत हा कृषिप्रधान देश असून भारतात कापूस हे महत्त्वाचे पीक आहे. आपल्या परिसरातही हे पीक अत्यंत महत्त्वाचे असून कापूस उत्पादन वाढीसाठी शासकीय स्तरावर मोठ-मोठे संशोधन आणि प्रयत्न केले जात आहेत. या संशोधनात कापसाच्या सघन लागवड पद्धतीचा समावेश आहे. या पद्धतीत शेतकऱ्यांनी मध्यम जमिनीत कपाशीची लागवड 90x30 सेंटिमीटर या अंतरावर करून तसेच अतिसघन लागवड तंत्रज्ञानात हलक्या प्रकारच्या जमिनीत 90x15 सेंटीमीटर अंतरावर कपाशीची लागवड करणे गरजेचे आहे. अशा प्रकारे कापूस उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांनी सघन लागवड तंत्रज्ञानाचा उपयोग करावा असे आवाहन केंद्रीय कापूस संशोधन केंद्राचे वरिष्ठ कीटक शास्त्रज्ञ डॉ. बाबासाहेब फंड यांनी केले ते कृषी व शेतकरी कल्याण, वस्त्रोद्योग मंत्रालय, भारत सरकार सहायित केंद्रीय कापूस पीक संशोधन केंद्र, नागपूर आणि कृषी विज्ञान केंद्र दुर्गापुर यांच्या संयुक्त विद्यमाने अंतरगाव तालुका दर्यापूर येथे विशेष कापूस प्रकल्प अंतर्गत आयोजित कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. गजानन चांदुरकर यांच्या शेतशिवारात आयोजित कार्यशाळेच्या मंचावर कार्यशाळेचे अध्यक्ष म्हणून कृषी विज्ञान केंद्र दुर्गापूरचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ के.पी. सिंह तर प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे वरिष्ठ कीटक शास्त्रज्ञ डॉ. व्ही. एस. नगराळे, न्यूजीव्हिडू सीड्स कंपनीचे सहायक महाव्यवस्थापक, नागपूर विभाग त्रिपुलसिंह ठाकूर, बायर क्रॉप सायन्स चे संतोष पापड, कृषी विज्ञान केंद्र दुर्गापुर कापूस सघन लागवड प्रकल्पाचे नोडल ऑफिसर डॉ. हर्षद ठाकूर,  कृषी विस्तार विभागाचे डॉ. प्रतापराव जायले, पशुसंवर्धन विभागाचे डॉ. महेश आखूड, नुझूविडूचे नटराज राठोड आदी मान्यवर उपस्थित होते. 
पुढे बोलताना डॉ. फंड म्हणाले की कपाशी हे शेतकऱ्यांसाठी नगदी पीक आहे. शेतकऱ्याचा आर्थिक कणा कापूस उत्पादनावर अवलंबून आहे. पूर्वीच्या पद्धती आता कालबाह्य ठरत असून शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञानासोबत स्वतःला उन्नत करीत राहणे गरजेचे आहे. शेतमालाचा भाव केवळ उत्पादनावर अवलंबून राहणे शक्य नसून तर उत्पादन वाढीबरोबरच उत्पादनाचा दर्जा उत्तम असल्यास मालाला निश्चित चांगला भाव मिळतो असेही ते म्हणाले. 
आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. सिंह म्हणाले की शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड करताना शेतीची पूर्व मशागत करणे अत्यंत महत्त्वाचे असून सेंद्रिय खताचा वापर पूर्व मशागतीसाठी करावा तसेच लागवड करताना बियाणांवर ट्रायकोडर्माची बीजप्रक्रिया करावी. शेतकऱ्यांनी सेंद्रिय खत आणि जैविक कीडकनाशकाचा वापर केल्यास उत्पादनाच्या खर्चात घट होऊन उत्पन्न वाढण्यात मदत होईल असेही ते म्हणाले.
आपल्या तांत्रिक मार्गदर्शनात डॉ. नगराळे यांनी कपाशीच्या किड व रोग व्यवस्थापन याबाबत सखोल मार्गदर्शन करून सघन लागवड प्रकल्पाची सविस्तर माहिती उपस्थित शेतकऱ्यांना दिली. तर डॉ. हर्षद ठाकूर यांनी कृषी विज्ञान केंद्र दुर्गापुर तर्फे राबविण्यात येणाऱ्या कापूस सघन लागवड तंत्रज्ञानाचा सविस्तर आढावा सादर केला. 
या कार्यशाळेच्या पूर्वी संशोधक कृषी शास्त्रज्ञ आणि कृषी कंपन्यांच्या प्रतिनिधींनी प्रक्षेत्र भेटीदरम्यान वडनेरगंगाई, उमरी, ईतबारपुर, खुरमाबाद, येवदा आणि इटकी  अंतरगाव आदी गावातील शेतकऱ्यांच्या कापूस सघन लागवड प्रकल्पाला प्रक्षेत्र भेटी दिल्या. 
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. हर्षद ठाकूर यांनी केले तर सूत्रसंचालन डॉ. प्रतापराव जायले यांनी केले तर महेश आखूड यांनी उपस्थितांचे आभार मानले.
कार्यक्रमाच्या प्रक्षेत्र भेटीदरम्यान सिंजेंटा इंडियाचे भैरव इंगळे, नुझूविडूचे शुभम नळकांडे, राशी सिड्सचे ऋषिकेश शिरसाट व श्री मानकर, टाटा रॅलीझचे प्रतीक बारब्धे, सुदर्शन केमिकलचे संकेत कोंडे, क्रिस्टल सिड्सचे आकाश सदार, कृषि विज्ञान केंद्र दुर्गापुरचे अक्षय गणेशपुरे, ऋषिकेश शिंदे, महेंद्र सेंगर, मुग्धा पिंजरकर यांनी कपाशी पीक प्रात्यक्षिक प्लॉटची उपस्थित शेतकऱ्यांना माहिती दिली.
कार्यक्रमाला वडनेरगंगाई, उमरी ईतबारपुर, खुरमाबाद, येवदा आणि इटकी  अंतरगाव येथील कापूस प्रकल्पातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये मंगेश पांडे वडणेरगंगाई, ज्ञांनेश्वर पाथरकर येवदा, मुकुंद कोळमकर व शांताराम कोळमकर उमरी ईतबारपुर, बादलसिंह सायर खुर्माबाद, गजानन चांदुरकर अंतरगाव यांच्या प्रक्षेत्रावर भेट देण्यात आले

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.