Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


ऐनपूर येथे सरदार पटेल विद्यालयात फॅन्सी ड्रेस स्पर्धा संपन्न

   [जितु कोळी प्रतिनिधी ऐनपूर ]*

सरदार पटेल पूर्व प्राथमिक विद्यामंदिरात फॅन्सी ड्रेस स्पर्धा उत्साहात संपन्न
प्रतिनिधी जितु कोळी ऐनपूर ता.रावेर - येथील ऐनपूर परिसर शिक्षण प्रसारक मंडळाने चालविलेल्या सरदार वल्लभभाई पटेल पूर्व प्राथमिक विद्यामंदिरात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची शनिवार रोजी शाळेत फॅन्सी ड्रेस स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
        याप्रसंगी विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा धारण केलेली होती जसे शिक्षक,डॉक्टर,पोलिस,वकील, शेतकरी,परी तसेच थोर पुरुष व फळ, फूल यावर आधारित विद्यार्थ्यांनी वेशभूषा धारण केलेली होती.व विशेष वेशभूषा म्हणजेच चंद्रयान-3 ही वेशभूषा धारण केलेल्या विद्यार्थ्यांचे शाळेत विशेषत: कौतुक करण्यात आले.विद्यार्थ्यांमधील उत्साह बघता शाळेचे मुख्याध्यापक शुभम महाजन यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.व या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील किरण चौधरी,अनिता महाजन,नम्रता बोदडे, वैष्णवी महाजन व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.