दि 2 ऑक्टोबर रोजी वरणगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज मंगल कार्यालय येथे शेतकरी पीक व्यवस्थापन कार्यशाळा कृषिसाम्राट ग्रुप जळगांव आणि बळीराजा कृषी केंद्र वरणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषिसाम्राट ग्रुप चे अध्यक्ष बाळासाहेब सूर्यवंशी तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून नि प्रकल्प संचालक (आत्मा) जळगांव डॉ अनिल भोकरे, राहुरी अहमदनगर येथील कृषीभूषण डॉ दत्तात्रय वने,कृषिसाम्राट ग्रुप चे सीइओ प्रसाद सुर्यवंशी हे उपस्थित होते हरभरा आणि कांदा पीक व्यवस्थापन संदर्भात मार्गदर्शन करतांना डॉ वने यांनी सांगितले की रब्बी हंगामात घेतल्या जाणार्या पिकापैकी हरभरा हे एक महत्वाचे कडधान्य पिक आहे. या पिकाचे शेती आणि मानवी आहारात अनन्य साधारण असे महत्व आहे. महाराष्ट्र राज्यातील गेल्या दोन-अडीच दशकामधील हरभरा लागवडीखालील क्षेत्र, उत्पादन आणि उत्पादकता याचे अवलोकन केले असता, यामध्ये सातत्याने वाढ झाल्याचे दिसून येते.
महाराष्ट्राच्या हरभर्याखाली क्षेत्र वाढत जाऊन सन 2017-18 मध्ये 88 लक्ष हेक्टर पर्यंत पोहचले आणि त्यापासुन 18.91 लक्षटन हरभरा निर्माण झाला. प्रगतीशील शेतकर्यांच्या शेतावरील नव्या वाणांचे उत्पादन हेक्टरी 30 ते 35 क्विं/हे पर्यंत किव्वा त्यापेक्षाही जास्त जाऊ शकते असा अनुभव आहे पारंपारिक पद्धतीमध्ये थोडासा बदल करुन पीक उत्पादन तंत्रज्ञानाची जोड देवून सुधारित वाणांचा वापर केल्यास या पिकापासून कोरडवाहु क्षेत्रातसुद्धा चांगले उत्पादन मिळते.असे प्रतिपादन त्यांनी केले यावेळी प्रगतिशील शेतकरी यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ अनिल पाटील, संजय पाटील, प्रतीक चौधरी, श्री वाघमारे, पवन पाटील, शुभम पाटील, आनंद पाटील, मुन्ना चौधरी,वैभव पाटील संदेश पाटील यांनी परिश्रम घेतले आभार पवन पाटील यांनी मानले प्रसंगी मोठया संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते