भुसावळयेथील अहिल्यादेवी कन्या विद्यालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली सर्वप्रथम शाळेच्या मुख्याध्यापिका व पर्यवेक्षक यांच्या हस्ते प्रतिमापूजन व मार्ल्यापण करण्यात आले त्यानंतर शाळेतील विद्यार्थिनी यांनी मराठी हिंदी इंग्लिश संस्कृत या भाषांमध्ये ईशा पाटील जानवी महाजन योजना कुरकुरे मिताली भंगाळे आकांक्षा नाले टीना बारी डिंपल काकडे हेमांगी पाटील या विद्यार्थिनी ही विचार व्यक्त केले यानंतर शाळेचे शिक्षक आशिष निरखे यांनी महात्मा गांधी यांच्या जीवनावर तर काशीराम बारेला यांनी लालबहादूर शास्त्री यांच्या विषयी विचार व्यक्त केले यानंतर शाळेचे पर्यवेक्षक संजीव पाटील यांनीही महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांचे विचार अमलात आणण्याचे सांगितले कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेच्या मुख्याध्यापिका मानसी कुलकर्णी या होत्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व नियोजन सोनाली राणे व योगिता पाटील यांनी केले कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षक कर्मचारी वर्ग व विद्यार्थिनी उपस्थित होते .