जितु कोळी याजकडून वृत्त संकलन
रावेर तालुक्यातील ऐनपूर येथिल सरदार वल्लभभाई पटेल पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्यामंदीरातील विद्यार्थ्यांनी स्वच्छतेसाठी श्रमदान केले.
याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक शुभम महाजन यांनी स्वच्छता ही सेवा आहे असे विद्यार्थ्यांना सांगितले.व स्वच्छता राखुन निरोगी राहण्याचा संदेश त्यांनी स्वच्छतेसाठी श्रमदान करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिला. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सुद्धा स्वच्छ भारत व स्वच्छ महाराष्ट्रासाठी श्रमदान कार्यात आपला सक्रिय सहभाग नोंदविला.यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी शालेय परिसराची संपूर्ण स्वच्छता केली.