ईनरव्हील क्लब ऑफ भुसावळ रेलसिटी ने आज दि 14 रोजी श्रीमती प.क.कोटेचा विद्यालयात 9वी व 10वी च्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी भाषण आयोजित केले .उत्तुंग भरारी फाउंडेशन,मुंबई चे संस्थापक ,कुशल मार्गदर्शक ,लेखक ,ट्रेनर श्री नितीन पाटील यांनी त्यांच्या ओघवत्या आणि उत्साहपूर्ण शैलीमध्ये मुलांना यशाचा मूलमंत्र दिला .
त्यांनी आपल्या आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी रोज मेडिटेशन ,वेगात चालण्याचा व्यायाम हे ऊपाय मुलांना सुचवले .याशिवाय अनेक प्रयोग मुलांकडून करून घेत सकारात्मकता कशी वाढवायची यांचे सोपे मार्ग सांगितले .सर्व मुलांकडून आयुष्यात यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रम करण्याबाबत संकल्प म्हणून घेतला .कार्यक्रमात सर्व श्रोते ,विद्यार्थी ,शिक्षक मंत्रमुग्ध झाले होते .