मजरे हिंगणे सोसायटीची शंभर टक्के वसुली
चेअरमन सचिव यांचा गौरव
मजरे हिंगोने विविध कार्यकारी सहकारी सोसायटी १००% पिक कर्ज परत फेड केल्याबद्दल दिनांक 25 / 9 / 23 रोजी जळगाव येथे जळगाव जिल्हा मध्यवर्ती सह. बँकेच्या वार्षिक सभेत मजरे हिंगोने विकास सोसायटीचे चेअरमन मा.श्री.सुधाकर पाटील सर व सचिव श्री.विजय पाटील यांचा सत्कार जिल्हा बॅंक चेअरमन मा.श्री.संजय मुरलीधर पवार, व व्हा.चेअरमन श्री.अमोल पाटील ,बॅंन्केचा संचालिका ताईसो.शैलजाताई निकम. यांच्या हस्ते करण्यात आला आहे
विविध कार्यकारी सहकारी सोसायटी, मजरे हिगोणे येथील 100 % कर्ज परतफेड करणाऱ्या सर्व सोसायटीच्या सभासद बंधू-भगिनींना यात सिंहाचा वाटा आहे कारण हे एक टीम वर्क आहे.
तसेच विविध कार्यकारी सहकारी सोसायटी, मजरे हिंगोने येथील सर्व चेअरमन , व्हा.चेअरमन तसेच सर्व सदस्य मंडळींचे देखील अथक परिश्रम घेतले आहे .