- गणेश भक्तांची देखावा पाहण्यासाठी मोठी गर्दी; शिवबा मंडळाने टाकाऊ वस्तूंपासून बनविले रॉकेट यान
वरणगांव येथील मोठा माळी वाड्यातील शिवबा मित्र मंडळ संचलित सार्व.फुले गणेश मंडळाने या वर्षी बाप्पा विराजमान असलेल्या जागी चंद्रयान - ३ ची प्रतिकृती देखावा सादर केला आहे.
शहरातील गणेश भक्तांची चंद्रयान-३ देखावा पाहण्यासाठी मोठा माळी वाडा येथे मोठी गर्दी होत असून चंद्रयान-३ देखाव्याने शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले आहे.
शिवबा मित्र मंडळ संचलित सार्व.फुले गणेश मंडळाचे हे ३० वे वर्ष आहे. शिवबा मित्र मंडळाने यापूर्वी देखील श्री संत सावता महाराज यांची कांदा, मुळा, भाजी लावलेल्या शेतीचा देखावा तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील एक प्रसंग आणि वीर सावरकर यांना झालेल्या काळ्या पाण्याची शिक्षेचा प्रसंग सजीव देखाव्यांच्या माध्यमातून साकारला होता. त्यावेळीं देखील या सजीव देखाव्याना पाहण्यासाठी नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती.
- राष्ट्राभिमान असल्याने साकारला देखावा
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) यांनी चंद्रयान-३ रॉकेट सोडले आणि ते चंद्रावर यशस्वीरित्या उतरले. आणि संपूर्ण जगात भारताचे नाव गौरवाने सुवर्ण अक्षरांनी कोरले गेले. प्रत्येक भारतीयाची छाती अभिमानाने भरून आली. म्हणूनच आम्हाला भारतीय असल्याचा राष्ट्राभिमान असल्यानेच आम्ही हे चंद्रयान -३ रॉकेटची प्रतिकृती साकारली असल्याचे मत शिवबा मंडळच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.
- टाकाऊ वस्तूंपासून बनविला रॉकेट
चंद्रयान-३ ची प्रतिकृती करण्याकरिता गणपती विराजमान होण्याच्या १५ दिवस अगोदरच आम्ही मोठे दोन पृष्ठ, कापड, लाकूड, पाईप या टाकाऊ वस्तूपासून रॉकेट बनवण्यासाठी सुरुवात केल्याचे सांगितले.
चंद्रयान-३ रॉकेट बनवण्यासाठी विवेक माळी, तेजस माळी, निखिल माळी, संकेत माळी, शुभम माळी, यश माळी, नितीन माळी, किरण माळी, बाळा माळी, अतुल माळी, विशाल माळी, गौरव माळी, भावेश माळी, अभिषेक माळी, ओम माळी, भूषण माळी, वैभव माळी, पप्पू माळी, राहुल माळी यांनी परिश्रम घेतले. शिवबा मंडळाचे मार्गदर्शक तथा शिवसेना शहरप्रमुख संतोष माळी, प्रवीण माळी, बापू माळी, पांडू माळी, गणेश माळी, भूषण माळी, दिलीप माळी, छोटू माळी यांनी मार्गदर्शन केले.