Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


मळगांव पाटचारी बाबत मुख्यमंत्री यांनी दखल घ्यावी

मळगाव पाटचारीबाबत मुख्यमंञ्यांनी दखल घ्यावी.
    देश स्वतंत्र होऊन सुमारे ७५ वर्षे पूर्ण झाली. तरी आमच्या शेतकऱ्यांच्या नशिबी पाण्या साठीची वणवन काही केल्या थांबेना अशी स्थिती सर्वञ बनली आहे. एक आशेचा किरण म्हणुन आम्ही सर्वजण शेतकरी वरखेडे लोंढे बेरेज प्रकल्पाकडे पाहत आहोत .गेले अनेक वर्ष प्रकल्प सुरू होऊन देखील यात प्रमुख समस्या तामसवाडी गाव हलवण्यात संबंधित होती .या  समस्येचे खासदार उन्मेश  पाटील यांच्या माध्यमातून निराकरण झाले. असे प्रसिद्धी माध्यमातून वाचण्यात आले होते . तसेच या प्रकल्पाचा सुमारे सुमारे  १४० ते १६० इतक्या गावांना मळगाव पाटचारी चा फायदा होणार आहे. त्यापैकी मळगाव भोरस, करगाव ,तरवाडे ,नाव्हे ,ढोमणे ,  वडाळा-  -वडाळी ,हिंगोणे, बांबरुड प्र. ब, कजगाव, पासर्डी व अशा  १४० ते १६० गावांना मळगाव पाटचारी चा फायदा होणार आहे. याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांना देण्यात येणार आहे. अशी माहिती मळगावचे रहिवाशी व शिवशक्ती भिमशक्तीचे भडगाव तालुका प्रमुख तथा मळगाव पाटचारी समिती प्रमुख शैलेश मोरे यांनी माहिती दिली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.