Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


आदीवासी बांधवाच्या मागण्या साठी वंचित बहुजन आघाडीचे यावल कार्यालया समोर उपोषण

*आदिवासींच्या विविध मागण्यांसाठी प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयावर वंचित बहुजन आघाडी व अ. भा. आदिवासी विद्यार्थी महासंघ तर्फे उपोषण करण्यात आले
यावल - आदिवासींच्या विविध मागण्यांसाठी प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयावर वंचित बहुजन आघाडी व अ. भा. आदिवासी विद्यार्थी महासंघ तर्फे वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे, अ. भा. आदिवासी विद्यार्थी महासंघ अध्यक्ष साहिल तडवी यांच्या नेतृत्वात आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते आंदोलकांनी विविध घोषणांनी प्रकल्प कार्यालय परिसर दणाणून सोडला 
प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांनी उपोषण स्थळी भेट देऊन सर्व मागण्या संदर्भात सकारात्मक चर्चा केली 
1)आदिवासी विकास प्रकल्प यांचे अधिकारी आदिवासी पाड्यांवर न फिरता दलाला मार्फत सर्वे करीत असल्यामुळे आदिवासींपर्यंत विविध योजनांचा लाभ पोहोचत नाही व अधिकारी कार्यालयात आलेल्या आदिवासी बांधवांशी उध्दट पणे बोलतात 
2)आदिवासींचे सुरू असलेले वन दावे तात्काळ मंजूर करून सातबारा त्यांच्या नावावरती करण्यात यावा, ग्रामपंचायत मार्फत घरकूल योजनेचा लाभ त्यांना देण्यात यावा.
आंदोलनात जिल्हा महासचिव दिनेश इखारे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा वंदना सोनवणे, कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष बालाजी पठाडे, जिल्हा संघटक राजेंद्र बारी,जिल्हा सचिव दिपक मेघे, यावल तालुकाध्यक्ष भगवान मेघे, तालुका महासचिव राजेश गवळी, जिल्हा उपाध्यक्ष मोहम्मद शफी,तालुका उपाध्यक्ष सागर झाल्टे,मेजर देवदत्त मकासरे,दिलीप भालेराव, कामगार आघाडी तालुकाध्यक्ष सुरेश बोदडे,संतोष तायडे, तालुका उपाध्यक्ष शरद अडकमोल, भुषण साळुंके, बाबुलाल पटेल, बिलालसिंग पारा, नरसिंग बारेला, हमीद तडवी, तुराब तडवी, शफी खान, श्याम डंगोरे,बिलसिंग पावरा, प्रतिभाताई कोळी, रोहन निकम, भुषण भालेराव, भानुदास महाजन, बळीराम कोळी, धीरज मेघे, जग्गु बारेला, प्यारसिंग बारेला, संभासिंग बारेला, आसाराम बारेला, रामदेव बारेला, रमेश जाधव, रजनीकांत डोळे आदि पदाधिकारी व कार्यकर्ते आंदोलनात सहभागी होते

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.