वरणगाव येथील गणेश नगर मध्ये स्वामी समर्थ मंदिर प्रांगणात 21 सप्टेंबर रोजी नर्मदेश्वर महादेव मंदिरात प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे
याप्रसंगी सकाळी सात वाजता विष्णू प्लाय पासून स्वामी समर्थ मंदिरापर्यंत ग्रामप्रदक्षणा शोभायात्रा व दिंडी काढण्यात येणार आहे
तसेच आठ वाजे पासून स्वामी समर्थ मंदिर प्रांगणात नर्मदेश्वर मंदीरात प्राणप्रतिष्ठा सोहळा ,नवग्रह पूजन , यज्ञ आदी कार्यक्रम संपन्न होणार आहे
सायंकाळी चार वाजेपासून सहा वाजेपर्यंत महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे
तरी भाविकांनी या कार्यक्रमात उपस्थिती द्यावी असे आवाहन गणेश नगर मधील भाविक रहीवाशी व स्वामी समर्थ सेवेकरी यांनी केले आहे