भुसावळ तालुक्यातील तळवेल येथील ४३ वर्षीय प्रोढाचा शेतात विजेचा शॉक लागुन मृत्यु झाल्याची घटना मंगळवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास घडली आहे .
तळवेल येथील निलेश उर्फ सोपान गोपाळ पाटील हा शेतात काम करीत असतांना मोटार सुरु करतांना त्याला विजेचा शॉक लागला असता तो बेशुद्ध झाल्यावर त्यास भुसावळ येथे खाजगी दवाखान्यात दाखल केले होते तेथे डॉक्टरां तर्फे त्यास मृत घोषित करण्यात आले
याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात शून्य क्रमाकांने फिर्याद दाखल केली होती नंतर वरणगांव पोलीस ठाण्यात सीआर पीसी १७४ प्रमाणे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे . मयतावर तळवेल स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे
मयत सोपानच्या पश्चात आई , पत्नी , एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे
सोपान हा बोरींग व विहीरीचे छोटे मोठे काम करायचा व मनमिळावु स्वभावाचा होता या घटनेने तळवेल गावावर शोककळा पसरली आहे