Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


किनगांव येथे वंचित बहुजन आघाडीची महीला शाखा उदघाटन संपन्न

किनगांव बु|| मध्ये वंचित बहुजन महिला आघाडी शाखा अनावरण सोहळा उत्साहात संपन्न

"गाव तेथे शाखा, गाव तेथे कार्यकर्ता" 

यावल - यावल तालुक्यातील किनगांव येथे वंचित बहुजन महिला आघाडीच्या शाखा उद्घघाटन व नामफलक अनावरण कार्यक्रम दिनांक 20/09/2023 रोजी दुपारी 1:00वा. जिल्हा प्रभारी रविकांत वाघ, जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत वंचित बहुजन महिला आघाडी जिल्हाध्यक्षा वंदना सोनवणे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न 

वंचित बहुजन आघडीचे सर्वेसर्वा ॲड प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडवण्याचा चंग उराशी बाळगून तालुक्यात मरगळलेळी वंचित पुन्हा सतेज करत गांव तेथे शाखा स्थापन करून पुढील आगामी होणाऱ्या निवडणुकीत सत्ता स्थापन करण्यासाठी जिल्हा प्रभारी रविकांत वाघ, जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे,महिला आघाडी जिल्हाध्यक्षा वंदना सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली यावल तालुका अध्यक्ष भगवान मेघे, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा प्रतिभाताई कोळी यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील विविध गावात शाखा स्थापनेसह गावात नामफलक अनावरण कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता.

यावल तालुक्याच्या वंचितच्या इतिहासात पहिल्या टप्यात प्रथमच तालुक्यात मोठया प्रमाणात गाव तेथे शाखा उघडली जात आहे. त्यामुळे आता यावल तालुक्यामध्ये वंचितला राजकीय संजीवनी प्राप्त होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शाखा उद्घाटन प्रसंगी वंचित बहुजन महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्षा मिरा वानखेडे, जिल्हा संघटक राजेंद्र बारी,छायाताई हिरोळे, संतोष तायडे, भुषण साळुंके, मेजर देवदत्त मकासरे, धीरज मेघे,किनगांव शहर अध्यक्षा मंगला सुनील कोळी,शहर उपाध्यक्षा मनीषा शरद अडकमोल,शाखा अध्यक्षा सबेरा गफुर तडवी,शाखा सचिव संध्या दत्तू भालेराव, शाखा कार्याध्यक्ष भारती संजय अडकमोल, शाखा सदस्य सपना  नाना साळुंके, लता रघुनाथ बाविस्कर,यमुनाबाई युवराज भालेराव, सुशिलाबाई उत्तम भालेराव, माधुरी विनोद मेढे,रेखा रवींद्र अडकमोल, ताराबाई शामराव तायडे,मंडाबाई बापू सपकाळे,जनाबाई श्रावण सोनवणे,कल्पना मनोहर अडकमोल, रमाबाई राजू अडकमोल,पूजा संजय सोनवणे,शिंधुबाई दामू साळुंके,शीतल चेतन भालेराव,तेजल सुनील सोनवणे, हसिनाबाई गाफुर तडवी,कल्पना शिधार्थ भालेराव,साधना गौतम निकम, ललिता राजू निकम,फरिदाबाई खाटीक,व दिलीप सोनवणे, रोहन निकम, भुषण भालेराव,बाबुलाल पटेल, भानुदास महाजन,सह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन संतोष तायडे यांनी केले व आभार प्रदर्शन भुषण साळुंके यांनी मानले

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.